आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनयाची आवड असेल तरच सिनेसृष्टीत या - सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ज्या युवक-युवतींना अभिनयाची आवड असेल त्यांनी सिनेसृष्टीत नक्की यावे आणि अशा युवक-युवतींना त्यांच्या पालकांनीसुद्धा प्रोत्साहन पाठबळ द्यावे,असे सूचवून प्रत्येक देशाची वेगवेगळी संस्कृती आहे. पण, जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती ही सर्वोत्तम आहे,असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काढले.

दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित हर्षवर्धन कला अकादमीतर्फे ज्ञानवर्धन कला महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी (दि.१०) संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडले. विजयी स्पर्धकांना प्राजक्ता माळीच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राजक्ता माळीने पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी भारतीय संस्कृतीसंदर्भात आपले मत व्यक्त केले.

मराठी भाषा ही खरोखरंच खूप सुरेख आहे. मराठी चित्रपटाला अलीकडे खूप चांगले दिवस आले आहेत. चांगले दिवस आले याचा अर्थ असा नाही की, सध्या मराठी चित्रपटांची ही लाट आहे. भविष्यात ही लाट अशीच कायम राहील. बहुतांश प्रेक्षक हे हिंदी चित्रपटांचे चाहते असले, तरी भविष्यात नक्कीच मराठी कलावंतांना एक मानाचे स्थान मिळेल, असे ती म्हणाली. महाराष्ट्राची मायबोली ही मराठी आहे, खरंतर येथे मराठी चित्रपटांना योग्य तो न्याय मिळायला हवा. परंतु, ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटांना प्रेक्षक अक्षरश: डोक्यावर घेतात, तसेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले, तर नक्कीच भविष्यात चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांचा बोलबाेला राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चित्रपट चांगले असले, तर प्रेक्षक नक्कीच तो चित्रपट बघतात. त्यासाठी प्रमोशन केले नाही, तरी प्रेक्षकच त्याची माऊथ पब्लिसिटी करतात. असेच मराठी चित्रपटांबद्दल झाले, तर नक्कीच मराठी अभिनेता अभिनेत्रीचा चित्रपट हा केवळ नावावर चालेल.

मराठी सिनेमाचे रिमेक का नाही
हिंदी भाषकांना मुळात मराठी झेपत नसल्याने ते मराठी चित्रपटांचे रिमेक करीत नाही, चांगले काम केले तर त्यावर कोणी बोट उचलत नाही. त्यामुळे आपली मेहनत, जिद्द, चिकाटी आणि दर्जेदार अभिनयाच्या जोरावर अंबानगरीतूनही चांगला कलावंत घडू शकतो, असे प्राजक्ताने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...