आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारू व्यवसायातून युवकाचा खून, दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने खळबळ; शहरात भीतीचे वातावरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी पोलिसांचा असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. - Divya Marathi
घटनास्थळी पोलिसांचा असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परतवाडा - शहरात मागील काही दिवसांपूर्वी अवैध वाळू व्यवसायातून एका युवकाला प्राण गमावण्याची वेळ आली. ती धग कायम असतानाच अवैध दारू व्यवसायातून अन्य एका युवकाला आपला जीव गमवण्याची वेळ आली. ही घटना बुधवारी (दि. १) दुपारी दोनच्या सुमारास सरमसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अब्बासपुरा परिसरात घडली. अमोल मोहन रक्ताळे असे मृतक युवकाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी अमोल फिस्के याला अटक केली. 

सरमसपुरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अब्बासपुरा परिसरात २२ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने सपासप वार करून दिवसाढवळ्या हत्या केल्याच्या घटनेमुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. अमोल मोहन रक्ताळे असे मृतक युवकाचे नाव असून ही हत्या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 

मृतक हा परिसरातीलच अमोल फिस्के (२२) याच्या घराच्या परिसरामध्ये मृतावस्थेत मिळाला. मृतकाचे अमोल फिस्केचे मागील काही दिवसांपासून अवैध दारू व्यवसाय उधारीच्या पैशांवरून खटके उडत होते अशी चर्चा होती. हा वाद कायमचा मिटवण्यासाठी आरोपीने मृतकाला दुपारच्या सुमारास घरी बोलावले. त्यांच्यात पुन्हा वाद झाले. यात संतापलेल्या आरोपीने मृतक अमोलच्या पाेटावर डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून जागीच खातमा केला. पोलिसांनी मृतकाचे वडील फिर्यादी मोहन श्रीराम रक्ताळे यांच्या तक्रारीवरून आरोपी अमोल फिस्के याला अटक केली. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला होता. 
 
तपास सुरु 
याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहरात शांतता रहावी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनेची पुढील तपास सुरू आहे- अभिजित अहिरराव

 
 
बातम्या आणखी आहेत...