आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेकोलिच्या खुल्या खाणीतून दररोज शस्त्र धाकावर लाखोंचा कोळसा चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - ‘ब्लॅकडायमंड सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहराच्या आजूबाजूच्या परिसरात वेस्टर्न कोल फिल्डच्या अनेक भूमिगत खुली कोळसा खाणी आहेत. या सर्व खाणी आज गैरव्यवहाराचे मुख्य केंद्र बनल्या आहेत. वेकोलिचे अधिकारी, सुरक्षारक्षक, स्थानिक राजकारणी नेते पोलिसांच्या आशीर्वादाने या खाणीतून दररोज लाखो रुपयांचा कोळसा चोरी करून तस्करी करण्यात येत आहे. या धंद्यात गँग ऑफ वासेपूरच्या धर्तीवर ‘गँग ऑफ ब्लॅक डायमंड सिटी’ सक्रीय असून लाखो रुपये हप्ता देऊन तसेच शस्त्राच्या धाकावर कोळसा चोरी केले जात असल्याची माहिती आहे.
 
वणी शहरालगत उकणी, पिंपळगाव, जुनाड, कोलारपिंपरी, राजूर, कुंभारखणी, घोन्सा येथे वेकोलिच्या खुल्या खाणी आहेत. या खाणीतून वीज उत्पादन करणारी महाजेन्कोचे विविध केंद्रावर रेल्वे मार्गाने कोळसा पुरवठा केल्या जातो. खाणीतून टिप्पर ट्रकद्वारे कोळसा वणी येथील रेल्वे सायडिंगवर आणला जातो येथून रेल्वेच्या व्हॅगनमध्ये चंद्रपूर, परळी, खापरखेडा, कोराडी, नाशिक या ठिकाणी पाठविला जातो. खाणीतून रेल्वेच्या मालधक्का पर्यंत रात्री दिवसा वाहतूक केली जाते. रात्रीच्या वेळी कोळसा वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रक टिप्पर मधून ते टन कोळसा बामणी ते निलापूर मार्गावर रस्त्याच्या बाजूने खाली करण्यात येतो. त्यानंतर पहाटे वाजता पासून सकाळी वाजेपर्यंत अनेक मिनी ट्रक, छोटा हत्ती, बोलेरो पीकअप सारख्या छोट्या चारचाकी वाहनात भरून चोरी केलेला संपूर्ण कोळसा लालपुलीया भागात कळमना रोडवरील एका ठिकाणी असलेले डेपोवर आणला जातो. या कोळशाची खासगी कोळसा व्यापारी, चुना भट्टा इतर ठिकाणी ४५०० ते ५००० रु. प्रती टन या भावाने विक्री होत असल्याची माहिती आहे.
 
कोळसा तस्करांच्या या टोळीकडून दररोज २०० ते ४०० टन कोळशाची विक्री करून लाखो रुपयांची काळी कमाई केली जात आहे. या कमाईतून वेकोलिचे अधिकारी, स्थानिक राजकारणी, पोलिस, परिवहन अधिकारी यांना त्यांचा हिस्सा चुकता महिन्याकाठी या गँगकडून पोहचविला जात असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या अंधारात तसेच पहाटेच्या अंधुक उजेडात तस्करीचा हा व्यवसाय सुरू आहे. शासनाच्या खजिन्याला चुना लावण्याचा हा अवैध व्यवसाय वणी परिसरात बिनबोभाटपणे सुरु आहे. येथील यवतमाळ मार्गावर लालपुलीया परिसरात अनेक खासगी कोल डेपो असून या कोल डेपो पैकी काही विशिष्ट डेपो तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. चार वर्षापूर्वी वणी पोलिस स्टेशनचे तात्कालीन ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी कोळसा तस्करांवर कठोर कारवाई करत कोळसा चोरीचा व्यवसाय बंद केला होता. नंतरच्या काळात या अवैध व्यवसायाला उधाण आले आहे.
 
अल्प काळात अमाप पैसा कमविण्याच्या या धंद्यात तरुण टोळ्क्यांसह काही गर्भश्रीमंत कुटुंबातील मुलांचा समावेश आहे. ट्रान्सपोर्टर काही चार चाकी वाहन वितरकांचासुद्धा यात समावेश आहे. वीज केंद्राला कोळसा पुरवणाऱ्या खाणी मध्ये या ट्रान्स्पोर्टरच्या स्वतंत्र गँग आहे. तिकडे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, सस्ती, लालपेठ, पद्मपुर, महाकाली, हिंदुस्थान लालपेठ, रेयतवारी, मुंगोली, निलजई, नाकोडा, या परिसरातील ७० टक्के कोळसा व्यवसाय वणी तालुक्यात स्थलांतरीत झाला असून त्या भागातील बहुतांश गँग आता वणी परिसरात सक्रिय झाले आहे. काही कोल वॉशरीज ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक या गँगच्या मागे असल्याचीही माहिती आहे.
 
कोळसा चोरी व्यवसायात स्पर्धा तसेच वर्चस्वाच्या वादातून या टोळक्यांमध्ये खटके उडायचे. काही वर्षापूर्वी कोळसा व्यापारी शागीर अहमद सिद्दिकी उर्फ टुन्नूची नागपूर येथे मनसे पदाधिकारी नंदू सूर याची पाटाळ्यात हत्या केली होती. या व्यवसायात अनेक गँग सक्रीय असल्याने कोल माफियामध्ये कधीही गँगवॉर होण्याची शक्यता आहे.
 
शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक
वेकोली वणी क्षेत्र अंतर्गत जुनाड, उकणी येथील कोळसा खाणीतून शस्त्राच्या धाकावर जबरीने कोळसा चोरी होत असल्याची तक्रार मिलाल्यानंतर मी स्वत: ठाणेदार वणी पोलिस अधीक्षक यवतमाळ एम. राजकुमार यांना भेटून या बाबत माहिती दिली आहे. तसेच खाणीच्या सुरक्षेसाठी राजूर कॉलरी येथून शस्त्रधारी सुरक्षारक्षक बोलाविण्यात आले आहे. वेकोलीकडे मनुष्यबळ कमी असल्या कारणाने कोळसा तस्कराची धंद्यात उधाण आले होते. मात्र आता येथील खाणीतून कोळसा चोरी होणे पूर्णपणे बंद झाले आहे.
- आर.के. सिंग, जनरल मॅनेजर, वेकोली वणी नॉर्थ एरिया
 
शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक
वेकोली वणी क्षेत्र अंतर्गत जुनाड, उकणी येथील कोळसा खाणीतून शस्त्राच्या धाकावर जबरीने कोळसा चोरी होत असल्याची तक्रार मिलाल्यानंतर मी स्वत: ठाणेदार वणी पोलिस अधीक्षक यवतमाळ एम. राजकुमार यांना भेटून या बाबत माहिती दिली आहे. तसेच खाणीच्या सुरक्षेसाठी राजूर कॉलरी येथून शस्त्रधारी सुरक्षारक्षक बोलाविण्यात आले आहे. वेकोलीकडे मनुष्यबळ कमी असल्या कारणाने कोळसा तस्कराची धंद्यात उधाण आले होते. मात्र आता येथील खाणीतून कोळसा चोरी होणे पूर्णपणे बंद झाले आहे.
- आर.के. सिंग, जनरल मॅनेजर, वेकोली वणी नॉर्थ एरिया
 

तस्कराना पोलिस राजकीय पाठबळ
वेकोलिच्या कोळसाखाणीतून दररोज लाखो रुपयांच्या कोळशाची चोरी होत असून या व्यवसायात येथील काही राजकीय पुढारी, पोलिस, वेकोली अधिकारी कोळसा व्यापाऱ्याचा सहभाग आहे. कोळसा चोरी करणाऱ्या टोळ्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होत नाही.
- राजू उंबरकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
 
बातम्या आणखी आहेत...