आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा, चारित्र्यावर घेत होता संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद- चारित्र्यावर संशय घेऊन तीला जाळून ठार मारणाऱ्या महागाव तालुक्यातील घानमुख येथील आरोपी पतीला पुसद येथील न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

या घटनेची हकीकत अशी की, महागाव येथे विवाह करून आलेल्या ताई शिवाजी इंगळेला विवाहानंतर मानसिक शारीरिक त्रास सासरकडील मंडळीं देत होते. तर पती शिवाजी शेषराव इंगळे हा आपल्या ४० वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. एकादिवशी दोघांत शाब्दिक वाद झाला असता रागाच्या भरात शिवाजीने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल तीला टाकून जाळले. त्यानंतर ताईने आरडाओरड केली असता शेजारील लोकांनी एकत्र येऊन तिला त्वरीत महागावच्या एका खासगी दवाखान्यात प्रथम उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी प्रकृती गंभीर झाल्याने महागावच्या डॉक्टरांनी सदर महिलेला पुढिल उपचारासाठी नांदेड येथे हलवण्याचा सल्ला दिला नांदेड येथील एका दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी महागाव पोलिसांनी मृतक महिलेचा पती शिवाजी याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदरचे प्रकरण पुसदच्या न्यायालयात तपासाअंती न्यायप्रविष्ठ करण्यात आले. या प्रकरणाची आज सुनावनी झाली. त्यावेळी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरून पुसद न्यायालयाचे न्यायाधीश जे.एस. शर्मा यानी आरोपी शिवाजी इंगळे यास जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी सरकारी वकील अॅड. अतुल चिददरवार यांनी काम पाहिले.