आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तालयाच्या हद्दीमधील पाच ‘पीआय’च्या झाल्या बदल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत पाच निरीक्षकांच्या गुरुवारी (दि. ५) बदल्या करण्यात आल्या. अमरावतीचे पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत आयुक्तालयाच्या विविध पोलिस ठाण्यातील पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिस निरीक्षक यांना त्यांच्याकडे असलेला कार्यभार आजच नवनियुक्त पीआय यांच्याकडे देऊन संबंधित अहवाल आयुक्तालयात सादर करावा लागणार आहे. आयुक्त व्हटकर यांनी केलेल्या बदल्यांमध्ये गाडगेनगर, खोलापुरी गेट, भातकुली, सिटी कोतवाली (गुन्हे) आणि पोलिस नियंत्रण कक्ष या पाच ठाण्यांचा सहभाग आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिस (सुधारणा पुढे चालू ठेवणे) अधिनियम -२०१४ आणि महाराष्ट्र पोलिस (सुधारणा) अध्यादेश २०१५ मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार आणि आयुक्तालय स्तरावरील पोलिस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोलिस निरीक्षकाच्या या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधी प्रत पोलिस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...