आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीस शहरांमध्येच अमरावती होणार स्मार्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- स्मार्ट सिटीसाठी निवडल्या जाणाऱ्या पहिल्या २० शहरांमध्ये अमरावतीचा समावेश असण्याचा आशावाद महापौर चरणजीतकौर नंदा यांनी व्यक्त केला आहे.

स्मार्ट सिटीबाबतची हैदराबाद येथील दोन दिवसीय कार्यशाळा आटोपून मंगळवारीच महापौरांचे अमरावतीत आगमन झाले. दरम्यान आज, बुधवारी त्यांच्या कार्यकाळाला एक वर्षाचा कालखंडही पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला.

महापौर म्हणाल्या, महाराष्ट्राच्या विशेषत: अमरावतीच्या मांडणीबद्दल केंद्र शासन अनुकूल आहे. मी खुद्द केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे अपेक्षा उंचावल्या असून, स्मार्ट सिटीबाबतचा अमरावतीचा प्रस्ताव योग्य दमदार ठरावा, यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन आमचे प्रयत्न सुरु आहेत.

त्यांच्यामते अमरावतीने पहिली स्पर्धा जिंकल्यामुळे आता पुढचा प्रवास सुकर झाला आहे. मात्र असे असले तरी शहरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे नियोजन इतर बाबींना अनुसरुन बरीच कामेही करावयाची आहेत. या सर्व प्रवासात नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत असून त्यांचाही मोठा वाटा असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

काय होणार अमरावतीत
स्मार्टिसटीचा प्रवास पुढे नेण्यासाठी अमरावतीतील ऐतिहासीक प्राचीन वास्तूंचे संवर्धन, वीज बचत, सौर उर्जेच्या स्रोतांचा विकास, घनकचऱ्याचे शंभर टक्के व्यवस्थापन, निरनिराळ्या िबलांच्या अदायगीसाठी वन युजर आयडी, बेरोजगारी घालविण्यासाठी जागतिक स्तराचे प्रशिक्षण, उत्कृष्ट खेळाडूंचे निर्माण, भूमीगत वीज वाहिन्या, पदपाथ, पुरेसे पार्किंग, शहरातील परिसरांची माहिती देणारे फलक आदी बाबी पूर्णत्वास जाणार आहेत.
प्रशासन पाठीशी
स्मार्टिसटीसाठी प्रशासन पूर्णत: पाठीशी आहे. नव्हे प्रशासनानेच पुढाकार घेतल्याने हे स्वप्न साकार होत आहे. मनपा आयुक्त,उपायुक्त, जिल्हाधिकारी यांचे सहकार्य आहेच. २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आयोजित कार्यशाळेसाठी पुन्हा मी जाणार आहे. चरणजीतकौरनंदा, महापौर, अमरावती.