आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवर येथे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर | तालुक्यातील शिवर येथीर अंकुश साहेबराव देशमुख (२८) युवा शेतकऱ्याने बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली. अंकुशकडे पाच एकर कोरडवाहू शेती असून त्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतलेे, परंतु पावसाने दगा दिल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यातच बँकेचे खासगी कर्ज त्याच्या डोक्यावर असल्याचे असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.