आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उपनिरीक्षकाच्या भरतीसाठीची वयोमर्यादा वाढवा : धनंजय मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांच्या वयाच्या अटीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी विधान परिषदेत शुक्रवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एमपीएससीच्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या भरतीसाठीच्या जाहीरातीत उमेदवारांसाठी वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी २८ व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३१ एवढी ठेवण्यात आली आहे.
मात्र, २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी खुल्या उमेदवारांसाठी वयाची अट ३८ तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ निश्चित करण्यात आली असताना या भरती प्रक्रियेत वयाची अट २८ व ३१ करण्यात आली आहे.
त्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून ५ वर्षापासून तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे, सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही बाब निदर्शनास आणून देत वयोमर्यादा वाढवण्याची विनंती केली.
त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सरकार गंभीर असून वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...