आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Does Not Need Bullet Train, Says Metro Man E Sreedharan

सध्या देशाला बुलेट ट्रेनची गरज नाही, पायाभुत सुविधा वाढवा -मेट्रोमॅन श्रीधरन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- भारतीय रेल्वेत पायाभुत सुविधांची वानवा आहे. दिल्ली मेट्रो यशस्वी झाल्यानंतर इतरही शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात आहे. या पार्श्वभूमिवर भारताला सध्याचा बुलेट ट्रेनची गरज नाही, असे परखड मत मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे कंपनीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मेट्रोमॅन ई. श्रीधरन नागपुरला आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, की दिल्ली मेट्रोचा पहिला टप्पा 65 किलोमीटरचा होता. त्यासाठी 10 वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. पण आम्ही केवळ सात वर्षे आणि तीन महिन्यात ही योजना पूर्ण केली. खर्चिक आणि मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प म्हणून मेट्रोकडे बघितले जाते. पण त्याचा लाभही तसाच होतो. नागपूर मेट्रोचा प्रत्येक वर्षी आढावा घेतला आणि त्याप्रमाणे उपाययोजना केल्या तर निर्याधित कलावधीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.
नागपूर मेट्रो समोर सध्या मोठे आव्हान आहे. डिसेंबर 2018 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. प्रकल्पाला उशीर झाला तर प्रत्येक वर्षी प्रकल्प खर्च पाच टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच दिवसाला तब्बल 50 लाख रुपयांचा फटका बसणार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, ई. श्रीधरण म्हणाले... वाहतूक कोंडीवर मेट्रोशिवाय सध्या पर्याय नाही....बुलेट ट्रेनची गरज नाही....