आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना: नागपुरात सात वर्षांत भारत अजेय; श्रीलंकेची परीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भारत आणि श्रीलंका संघ शुक्रवारी दुसरी कसोटी खेळतील. हा सामना नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होईल. भारताने गेल्या सात वर्षांत या मैदानावर एकही सामना हरला नाही. दुसरीकडे श्रीलंकेने कधीही विजय मिळवला नाही. या दोन्ही संघांतील पहिल्या कसोटी सामना बरोबरीत राहिला. नागपूर कसोटीचादेखील निकाल लागला नाही, तर १९९७ नंतर पहिल्यांदा दोन्ही संघ सलग दोन कसोटी ड्रॉ खेळतील.   


नागपूरमध्ये भारताला विजयाची आशा आहे. त्याचे तीन कारणे आहेत. पहिले यजमान संघ असल्याने या मैदानाचा त्यांना अनुभव आहे. दुसरे म्हणजे भारताने येथे आपल्या मर्जीप्रमाणे वेगवान खेळपट्टी तयार केली आहे. दोन्ही संघाच्या तुलनेत भारताकडे चांगले व आक्रमक वेगवान गोलंदाज आहेत. तिसरे म्हणजे या मैदानावरील विक्रम, ज्यामुळे सामन्यावर परिमाण करत नाही, मात्र आत्मविश्वास नक्की वाढवतो. भारताने नागपुरात (जामठा आणि विदर्भ स्टेडियम) एकूण १४ सामने खेळले आहेत आणि यातील पाच जिंकले. पाचमधील तीन विजय डावाने मिळाले आहेत.


ईशांतला पसंती
भारत या सामन्यात तीन वेगवान गोलंदाज व दोन फिरकीपटूंसह उतरवेल. मो. शमी व उमेश यादव यांची जागा निश्चित आहे. तिसरा पर्याय म्हणून ईशांत शर्मा व विजय शंकर हे दोघे आहेत. मात्र अष्टपैलू विजयऐवजी तज्ञ ईशांतला अंतिम अकरात संधी मिळेल.


कोलकात्यातील पहिली कसोटी बरोबरीत राहिली
- ५ सामने जिंकला भारत नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या १४ कसोटींपैकी. तीन पराभूत झाला व सहा बरोबरीत राहिले.  
- १५ बळी घेतले आहेत अश्विनने नागपूरच्या मैदानावर. अनिल कुंबळे (२०) आणि हरभजनसिंग (१९) यशस्वी गोलंदाज ठरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...