आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारंजा येथे मंगरुळपीर रोडवरील भरधाव इंडिका व्हीस्टा कारने दोघांना चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्याच्या कडेला घसरलेली कार. - Divya Marathi
रस्त्याच्या कडेला घसरलेली कार.
 कांरजा- मंगरुळपीर रोडवरील शेतकरी निवासाजवळ इंडिका व्हीस्टा कारने दोघांना चिरडल्याची घटना ४ मे रोजी दुपारी दीड वाजता घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच. ३७ (३९७६) या क्रमांकाच्या भरधाव इंडिका कारने कारंजा शहराकडून मंगरुळपीरकडे जाणाऱ्या इंडिका कारच्या चालकाने रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात कारवरील नियंत्रण गमावले. कारवरील नियंत्रण सुटल्याने येथील शेतकरी निवासातून जेवण करुन पायदळ घराकडे जाणाऱ्या जगदीश सुरेश तायडे (वय-४८, रा. सरस्वतीनगर, कारंजा) यांना उडवले. या अपघातात ते जागीच ठार झाले तर रस्त्याच्या कडेला बसलेले सलीम इस्लाम शहा (वय-४५, रा. पारस, ता. बाळापूर, जि. अकोला) हे गंभीर जखमी झाले. त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. या प्रकरणी कारचा चालक प्रवीण हरीराम पाटील (वय-३२) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...