आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त वाहतुकीचा इर्विन चौकात आणखी एक बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील बेशिस्त वाहतूक, पोलिसांना जुमाननारे वाहनचालक, वाहनांची गर्दी बेशिस्त पार्किंगमुळे संकुचित झालेल्या रस्त्यांनी सोमवारी इर्विन चौकात संतोष विठ्ठलराव मोहिते (३५) या सायकलस्वाराचा बळी घेतला. दूध डेअरीवर मजुरीसाठी जात असताना सिलिंडरच्या ट्रकने चिरडल्याने मोहितेंचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना इर्विन चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप. बँकेसमोर सोमवारी दुपारी वाजताच्या सुमारास भर पावसात घडली. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या भीषण घटनेमुळे मोहिते यांचे दोन चिमुकली मूल पत्नी यांना जबर धक्का बसला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अंत्यत संवेदनशिल असलेल्या या पॉईन्टवर अपघाताच्यावेळी वाहतूक पोलिस कार्यरत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शहरातील प्रमुख वर्दळींच्या मार्गावर वाहतूक व्यवस्था वाहनांच्या वाढलेल्या प्रचंड संख्येमुळे बेशिस्त असल्याचे चित्र दरदिवशी पहायला मिळत आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच नसल्यामुळे निम्मे रस्ते रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांनी गिळले आहे. इर्विन चौक वाहतुकीच्या दृष्टीने शहरातील अंत्यत संवेदनशिल चौक आहे, इर्विन उर्वरितपान
मृतकाची सायकल उचलताना पोलिस.

या विचित्र घटनास्थळी होते वाहतुकीची कोंडी : ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी रेल्वेस्टेशनकडून येणारी वाहतूक, डफरीन रुग्णालय, वालकट कम्पाऊंड, मालविय चौक, तसेच गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी, तसेच राजापेठवरून उड्डाणपुलावरून येणारी वाहतुकीसह अन्य भागतून वाहतूक एकाचवेळी एकाचठिकाणी एकत्र येते. यातही या पॉईन्टवर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल नाही. याच बेशिस्त वाहतुकीमुळे ही घटना घडल्याचे बाेलल्या जाते.
मृतदेहाचा ट्रेचर न्यावे लागले फुटभर पाण्यातून : इर्विन रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अपघातस्थळ अंदाजे ५० मीटर होते. त्यामुळे मृतदेह ट्रेचरवर टाकूनच रुग्णालयात नेण्यात आला. बेशिस्त वाहतुकीमुळे मृतदेह असलेले ट्रेचरसुद्धा मुख्य मार्गावरून घेऊन जाता आले नाही. यावेळी फूटभर साचलेल्या पाण्यातून हे ट्रेचर न्यावे लागले. यावरून शहरातील वाहतुकीची परिस्थिती किती भयावह आहे, हे लक्षात येते.

बातम्या आणखी आहेत...