आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिद्दरवारकडील दरोड्यातील मुख्य सुत्रधार वर्षांनी जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - शहरात गेल्या दोन वर्षापुर्वी बंदुका चाकूच्या धाकावर सव्वा आठ लाखाचा दरोडा घालण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी पंडीत मिश्रा यास अटक करण्यात तब्बल दोन वर्षानंतर पुसद शहर पोलिसांना यश आले आहे. गेल्या दोन वर्षापासून फरार असलेल्या मिश्रा या आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यासंदर्भात न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच पुसद शहरचे ठाणेदार वाघु खिल्लारे यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यामुळे आता दरोड्यात चोरी गेलेले दागिने आणि इतर वस्तुंची माहिती मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.तर दोन वर्षानंतर दरोड्यातील मुख्य आरोपी मिळाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आता आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी कोणत्या कौशल्याचा वापर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
२९ मे २०१५ ला६ दरोडेखोरांनी पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा ऱ्या रामनगर परिसरात राहणाऱ्या जयंत वसंतराव चिद्दरवार यांच्या घरात घुसून दोन बंदुका, चाकूच्या धाकावर सशस्त्र दरोडा घातला होता. यावेळी दरोडेखोरांनी घरातील सर्वांना मारहाण करून घरातील एका खोलीत बंद करून सोन्याचे दागदागिने अंदाजे लाख २५ हजार रूपये किमतीचे घेवून पसार झाले होते. या घटनेनंतर चिद्दरवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींवर दरोड्यासह इतर अनेक कलमान्वये गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची श्वान पथकाकडून पाहणी केली होती. इतकेच नव्हे तर आरोपीचे स्केच तयार करून आरोपीचा शोध लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 
 
दरम्यान पोलीस स्टेशन वडगाव रोड यवतमाळ यांच्या हद्दीमधील श्रीकृष्णनगरातील सौ. शर्मीला सतिष फाटक यांच्या घरी २३ जानेवारी २०१६ रोजी रात्री ११ वाजता आरोपींनी बंदुकीच्या धाकावर घरात घुसून दरोडा घालुन सोन्याचे दागिने रोख असा मुद्देमाल एकुण किंमत ५८ हजार पाचशे रूपये असा लंपास केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर गुन्हे नोंदवले होते. त्यामध्ये आरोपी रमेश रंगराव कदम वय ३७ वर्ष रा. नविन पुसद यांच्यासह अकोला जिल्ह्यातील आरोपी असे मिळुन सहा जणांना यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागाने दिनांक १९ जुन २०१६ रोजी अटक करून त्यांच्या कडून गुन्ह्यातील मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण लाख ९६ हजार ९५० रूपयांचा माल जप्त केला. त्यामध्ये आरोपी रमेश कदम याने गुन्ह्याचे तपासा दरम्यान पंडीत उर्फ संजय विठ्ठलराव मिश्रा, राजु पांडे पुण्याहुन आणलेले दरोडेखोरांच्या मदतीने पुसद येथील जयंत चिद्दरवार यांच्या घरी दरोडा टाकल्याची माहिती दिली. सदरची माहिती एलसीबीने पुसद पोलिसांना दिली. त्यावरून पुसद शहर पोलिसांनी रमेश कदम यांना कायदेशीररित्या ट्रान्सफर कार्यवाहीमध्ये ताब्यात घेवून तपास करण्यात आला. परंतु सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान कदम कडुन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले नाही. परंतु कदम यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल पंडीत मिश्रा यांचेकडे असल्याचे सांगीतले. तेव्हापासुन पंडीत मिश्रा इतर आरोपींचा शोध घेण्यात सुध्दा पुसद शहर पोलिसांना यश आले नाही. 

दरम्यान पुसद दरोड्यातील मुख्य आरोपी पंडीत मिश्रा यास आपणास अटक होण्याची माहिती मिळाल्यावरून पंडीत यांनी अटकपूर्व जमानतीसाठी प्रयत्न चालविले होते. असे असतांना २९ डिसेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय पुसद यांनी आरोपी पंडीत मिश्रा यास अटकपूर्व जामीन मंजुर करून पुसद शहर पोलीस स्टेशनला दर सोमवार, बुुधवार, शुक्रवार ला हजर राहुन तपासात सहकार्य करण्याचे आदेशीत केले. परंतु आरोपी याने गुन्ह्यात तपासाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तसेच पो. स्टे. ला हजर आला नाही. तसेच घरी सुध्दा आढळुन आल्याने गुन्ह्याचे तपासात अडचण निर्माण होत असुन न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याने तपासात कोणतीही माहिती देत नसल्याने पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वाघुजी खिल्लारे यांनी आरोपी पंडीत मिश्रा चा अटकपूर्व मंजुर झालेला जमानतीचा अर्ज नामंजूर करण्यासाठी वि. न्यायालयात दिनांक २७ मार्च २०१७ रोजी पत्र देण्यात आले. दरम्यान पुसदचे शेषन कोर्टाचा प्रभार दारव्हा येथील जिल्हा न्यायधिश के. व्ही. शेंदाणे यांच्याकडे असल्याने २४ मे २०१७ रोजी या अर्जावर निकाल जाहीर करीत आरोपीने जर न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले नसेल तर पोलिसांनी आरोपी पंडीत मिश्रा यास ताब्यात घ्यावे असे न्यायालयाने आदेश पारीत केले. 

यांनी केली कारवाई 
हेआदेश पारीत होताच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वाघुजी खिल्लारे यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश ठाकरे, जमादार प्रकाश आडे, दयानंद जांबळे, पोलीस शिपाई दिपक ढगे, अतुल दातीर जलाल यांच्या टिमने सापळा रचून दिग्रस परिसरात आरोपी मिश्रा यास शिताफीने अटक केली. तसेच आता गुन्ह्यातील रिकव्हरी बाबत नागरिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...