आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गाडगेबाबांच्या जन्मभूमीमध्ये दारूची बाटली होणार आडवी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकर्डा - संतगाडगे महाराजांनी आपल्या किर्तनातून दारूने दुष्परिणाम सांगून तिला दूर ठेवण्याचे प्रबोधन करून समाजाला जागृत करण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेऊन अख्खे आयुष्य वेचले. तरीही या संतभूमीत अनेक वर्षापासून कुटुंबांची राख करणाऱ्या दारूची विक्री खुलेआम सुरू होती. अखेर दारूचे दुकान कायम बंद करण्यासाठी आता महिलांसह गावकऱ्यांनी प्रचंड एकजुट केली अाहे. पतीचा दबाव झुगारून महिलांनी तर धनशक्तीला ठोकर मारून दोन जून रोजी मतदानात घराघरातून प्रत्येकाने हिरीरीने भाग घेण्याचा निर्धार केला आहे. यासोबतच दारू दुकान समर्थकांच्या मुसक्या आवळण्याची तयारी गावकऱ्यांनी सुरू केली असून कोणत्याही परिस्थितीत संताच्या जन्मभूमीत बाटली आडवी करण्यासाठी चा चंगच गावकऱ्यांनी बांधला असल्याचे चित्र सध्या कोकर्ड्यात दिसून येत आहे. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर ठिगळाचे कपडे घालून दारूबंदी, अंधश्रद्धा, हुंडा आदी चालीरीती बंद व्हाव्या यासाठी गावोगावी पायपीट करून प्रबोधन केले. कोकर्डापासून अवध्या दीड किमी अंतरावर असलेल्या या महान सुधारकाची जन्मभूमी असलेल्या शेंडगावच्या परिसरातच अनेक वर्षांपासून दारूची विक्री होत होत आहे. त्यातच राष्ट्रीय सणही दारूच्या दुकानापुढे साजरा होणारे कोकर्डा कदाचीत एकमेव गाव असावे. त्यामुळे गाडगेबाबांचे कर्तुत्व केवळ देवघरातील प्रतिमेला हार अर्पण करण्यापुरतेच मर्यादीत राहिले होते की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु गावात सुरू असलेल्या एकमेव दुकानामुळे परिसरातील गावातील दारूमुळे घराघरात जळत असलेल्या महिला, उध्वस्त होत असलेली आयाबहिणींची आयुष्य पाहून अखेर नारीशक्तीसह गावकरी दुकान कायमस्वरूपी बंद होण्यासाठी निकराची लढाई देण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या गावकऱ्यांच्या या आंदोलनाला दुकानाला सील लावण्याचे प्राथमिक यश प्राप्त झाले असून खरी लढाई जून रोजी होणाऱ्या मतदानावर अवलंबून आहे. दरम्यान, दारूचे दुकान कायमचे बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे मतदानात भाग घेवून दुकान कायमचे बंद करण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांकडून मतदानात भाग घेण्यासाठी जागरुकता करण्यात येत असल्याचे चित्र गावात दिसून येत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात परिसरातील पाच-सहा गावांतील महिला सहभागी झाल्याने संत गाडगेबाबांच्या भूमीत या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 
 
दारूचे दुकान कायमचे बंद होणार 
^महिलांनीदारूबंदीच्याविरोधात उभारलेल्या आंदोलनात गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे होणाऱ्या मतदानातही गावकऱ्यांचाच विजय होणार आहे.’’ - सुनील काकड 

जागरुकता सुरू 
^दुकान कायमचे बंद झाल्यास घराघरात शांतता राहील. त्यामुळे मतदानासाठी प्रत्येकाने भाग घेण्यासाठी जागरुकता करावी. प्रमोदसावरकर 

विजय गावकऱ्यांचाच 
^महिलांनी दबावालाबळी पडता मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.प्रत्येकाच्या सहभागाने अखेर जय गावकऱ्यांचा होणार आहे.’’ नितीन इसळ 

प्रत्येकाचा सहभाग 
^दारूच्या विरोधात प्रशासनाने अखेरची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने करणे आता मतदारांच्या हातात आहे. सागर तायडे 

मतदानात भाग घेणार 
दारूबंदीच्या विरोधातउभ्या ठाकलेल्या या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मतनासाठी आम्ही हिरीरीने सहभाग घेणार आहोत.’’ पुष्पा सावरकर, माजी जि.प.सदस्य 

पीढी वाचली पाहिजे 
^दारूने अनेक कुटुंब मातीत गेली. यापुढे तरी अशी कुटुंब वाचावीत म्हणून मतदाना साठी जागृती करण्यात येत आहे. बंडूकाकड 

बाटली आडवी करू 
^दारूच्या दुकानासमोर राष्ट्रध्वजाला सलामी देणारे कोकर्डा एकमेव गाव असावे. हे दुकान स्थलांतरीत करण्यासाठी यापुर्वीही अनेक प्रयत्न केले. परंतु यावेळी मात्र होणाऱ्या मतदानात बाटली कायमची आडवी केली जाईल.’’ श्रीकृष्ण सावरकर 

दुकान बंद झाल्यास अनेकांची दारू सुटेल 
^दारूचे दुकान उघडे दिसल्यास पिण्याची इच्छा होतेच. दारू सोडण्याची मनोमन इच्छा आहे. त्यामुळे दुकान बंद करण्यासाठी मतदानात आम्हीही पुढाकार घेणार आहे.’’ -प्रफुल्ल सावरकर 
आम्हीच जिंकू 

^तरुण पीढीदारूच्या आहारी गेली आहे. दारु गावातून कायमची हद्दपार करण्यासाठी मतदानाची लढाई जिंकण्याचा निर्धार केला.’’ स्वोर्गव माहोरे 

आम्ही महिलांसोबत राहणार आहाेत  
^गावात दारूबंदीसाठी महिलांनी उभारलेल्या लढ्याला प्राथमिक स्वरुपात यश आले आहे. अखेरची जूनची लढाई लढण्यासाठी आम्हीही महिलांसोबत आहोत.’’ डॉ.नितीन सावरकर 
कोकर्डा येथील दारूच्या दुकानासमोर दरवर्षी अशी राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाते. 
बातम्या आणखी आहेत...