आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: भू-विकास बँकेच्या 1500 कर्मचाऱ्यांचे 300 कोटी रखडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शासन निर्णयावर मागील दोन वर्षांपासून कारवाई होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासन आदेश असताना देखील राज्यातील भूविकास बँक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे निवृत्ती वेतन तसेच वेतनाचे पैसे देण्यात आलेले नाही. राज्यातील तब्बल १५०० कर्मचाऱ्यांचे ३०० कोटी रुपये मिळाले नसल्याचे महाराष्ट्र राज्य सरकारी भूविकास बँक कर्मचारी महासंघाचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज थकल्याने भूविकास बँक अवसायानात काढण्याचा निर्णय घेतला. मात्र ‘अवसायन’ या तांत्रीक शद्बांचा शासकीय अधिकाऱ्यांनी दुरुपयोग करीत राज्यातील जिल्हा भूविकास बँक कर्मचाऱ्यांची ८ वर्षांपासून ग्रॅज्यूइटी रक्कम, कार्यरत कर्मचाऱ्यांचे मागील ४० महिन्यांपासूनचे थकीत वेतन तसेच शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपासून रक्कम देण्यात आलेली नाही. बँकेच्या ६१ स्थावर मालमत्ता असून बाजार भावाप्रमाणे २ हजार कोटी रुपये किंमत आहे. ७०० कोटी रुपये शेतकऱ्यांकडून कर्जाची वसूली येणे आहे.
बातम्या आणखी आहेत...