आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा शुल्क वाद निपटाऱ्यासाठी न्या. पळशीकर समिती स्थापन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- शाळा शुल्कांवरून शाळा व्यवस्थापन आणि पालकांमधील वादाचा निपटारा करण्यासाठी अखेर राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती व्ही. जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच समिती आहे.  या समितीत मुंबईच्या विभागीय शुल्क संनियंत्रण समितीचे प्रमुख के. आर. वॉरियर, विभागीय शुल्क संनियंत्रण समितीचे सदस्य मोहन आवटे, शिक्षण  संचालक (प्राथमिक), माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक व सहसंचालक, विधी विभागाचे सहसचिव, शाळा व्यवस्थापन तसेच पालक वर्गाच्या वतीने प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश राहणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव हे या समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत. 

शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये शाळा शुल्कावरून उद््भवणाऱ्या वादाचा निपटारा करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच जिल्हास्तरावर शुल्क संनियंत्रण समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांकडे पालक वर्गाकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. शाळांनी पालकांच्या संघटनांना विश्वासात न घेताच शुल्क वाढवल्याच्या या तक्रारी आहेत. या समित्यांचा निर्णय अमान्य असल्यास शाळा व्यवस्थापन तसेच पालकांच्या संघटनांना या समितीकडे दाद मागता येणार आहे. आतापर्यंत ही व्यवस्था नसल्याने शाळा व्यवस्थापन तसेच पालकांना नेमकी कोणाकडे दाद मागावी, याबाबत अडचणी होत्या, त्या अाता दूर हाेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...