आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारच्या महिलेचा मोबाईल घेवून निघाली होती प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भज्ञान विज्ञान संस्थेच्या आवारातील एका विहिरीत तीन दिवसांपूर्वी सतरा वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला होता. प्रतीक्षा रामटेके (रा. बडनेरा) असे या युवतीचे नाव असल्याचे बुधवारी पुढे आले होते. १९ मे रोजी सांयकाळी मोठ्या बहिणीने प्रतिक्षाजवळचा मोबाईल घेतला होता, त्यानंतर तीने शेजारी राहणाऱ्या महिलेचा मोबाईल घेतला होता मोबाईल घेवूनच ती बाहेर पडली. प्रतिक्षाचा मृत्यू हा घातपात आहे कि आत्महत्या? याचा शोध घेण्यासाठी गाडगेनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे मात्र अद्याप पोलिस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचले नाहीत. 
 
प्रतिक्षाला चार बहिणी एक भाऊ आहे. त्यापैकी दोन बहिनींचे लग्न झाले आहे. त्यामुळे प्रतीक्षा, तीची एकमोठी बहिण, आई आणि भाऊ हे घरात राहत होते. तीच्या घरात कोणाकडेही मोबाईल नव्हता. दरम्यान शुक्रवारी १९ मे रोजी सांयकाळी प्रतिक्षाच्या बहिणीला तीच्याकडे मोबाईल असल्याचे लक्षात आले, त्यामुळे हा मोबाईल तीने घेतला कोणाचा आहे, कुठून आला अशी विचारणा प्रतिक्षाला केली. मात्र तीने कुठल्याही प्रश्नाची उत्तर देता रात्री आठ वाजताच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या मेश्राम नामक महिलेचा मोबाईल घेतला. एक फोन लावायचा आहे, असे सांगून मोबाईल घेवून ती निघून गेली. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर फोन लावला मात्र प्रतिक्षाने फोन उचलून कट केला. त्यानंतर तीन दिवस प्रतिक्षाचा कुठेही पत्ता नव्हता. दरम्यान व्हीएमव्ही परिसरात एका विहिरीत एक अनोळखी तरुणीचा मृतदेह दिसला होता. या मृतदेहाची बुधवारी (दि. २४) ओळख पटली. 

बडनेरातून प्रतीक्षा या ठिकाणी कशी पोहचली. हा शोध पोलिस घेत आहे. तसेच प्रतिक्षा घरुन निघाली त्यावेळी जे कपडे तीच्या अंगात होते, ते कपडे मात्र मृतदेहाच्या अंगावर नव्हते. याचाच अर्थ घरुन निघाल्यानंतर प्रतिक्षाने दुसरे कपडे घातले. तसेच शुक्रवारी उशिरा रात्री तसेच शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत प्रतिक्षाकडे असलेला मेश्राम यांचा फोन सुरू असल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे येत आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री तीने मेश्राम यांच्या मोबाईलवरून शहरातील बिच्छू टेकडी परिसरातील एका युवकासोबत संभाषण केल्याचे तपासात आले आहे, त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी गुरूवारी त्याला अन्य एक युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी घरी जाऊन घेतली माहिती 
दरम्यान गाडगेनगरचे प्रभारी ठाणेदार अनिल कुरळकर त्यांच्या पथकाने गुरूवारी बडनेराला जाऊन प्रतिक्षाच्या घरी परिसरात चोकशी केली. प्रतिक्षा बडनेरातच एका डॉक्टरांकडे घरकाम करण्यासाठी जात होती. शुक्रवारीही ती कामाला गेल्याचे पोलिसांना माहीती मिळाली. तीच्या काही मैत्रीणींकडूनही पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...