आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराच्या छतावरच फुलवला सेंद्रिय शेतीचा मळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अनेकव्यक्तींना गार्डनिंगची अावड असते, त्यामुळे घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या मागील बाजूला फूलझाडे, शोभेची झाडे लावणे त्याचे संगोपन करणे असा छंद अनेकांना असतो. मात्र, हा छंद जाेपासताना गार्डनिंगसोबतच आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सेंद्रिय भाजीपाला घरच्या घरीच उपलब्ध होईल, असा प्रयत्न शहरातील एका दाम्पत्याने केला यामध्ये ते यशस्वी ठरले. मागील दहा वर्षांपासून सर्वोदय कॉलनीमध्ये राहणारे सावरकर दाम्पत्य घराच्या छतावरच अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने मळा फुलवत आहेत.

प्रभाकर सरस्वती सावरकर यांनी घराच्या छतावर जवळपास ८०० वर्गफूट जागेत हा सेंद्रिय मळा फुलवला आहे. या छतावरील शेतात त्यांनी सध्या वांगे, भेंडी, कारले, कोवळे, मिर्ची, काकडी, चवळी, गवारच्या शेंगा हा भाजीपाला फुलवला आहे. यासोबतच दुर्मिळ असा वाणीचा हुरडा (ज्वारीचा प्रकार), तूर वाळासुद्धा लावलेला आहे. घराच्या छतावर काळ्या मातीचे आच्छादन करून त्यामध्ये या विविध पिकांची पालेभाज्यांची लागवड यशस्वीपणे त्यांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून सावरकर दाम्पत्य हा आगळावेगळा छंद जोपासत आहे.

अंटीची अशीही घंटी : प्रभाकरसावरकर हे दिवसातील बहुतांश वेळ गच्चीवरील या शेतात व्यस्त असतात. अशा वेळी त्यांना पत्नीसोबत काही काम असले तर त्यांना आवाज देणे शक्य नाही, कारण आवाज खाली येत नाही. म्हणून त्यांनी दोन घंटी लावल्या. एक घंटी गच्चीवर तर दुसरी घरात स्वयंपाक खोलीमध्ये आहे. गच्चीवरून घंटी वाजली तर काकूंनी घरातून हो द्यायचा आणि गच्चीवरील घंटी वाजली तर काकांनी हो द्यायचा, असा घंटीचा फायदा आहे. यामुळे वीज महत्त्वाचा त्रास वाचलेला आहे.

बाजारातील भाजीचे दर माहीतच नाही
पंधरावर्षांपूर्वी एक पुस्तक वाचत असताना एका देशाच्या प्रगतीसाठी गच्चीवरील शेत महत्त्वाची भूमिका निभावते, असे वाचले. त्याच दिवशी ठरवले त्या वेळीपासूनच या शेतासाठी प्रयत्न सुरू केले. मागील दहा ते बारा वर्षांपासून गच्चीवर हे शेत फुलवले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांत सेंद्रिय भाजीपाला खायला मिळत आहे. त्यामुळे बाजारातील भाजीचे दर आम्हाला माहीतच नाही. शक्य असल्यास प्रत्येकानी आपल्या गच्चीवर असे शेत तयार करावे.'' प्रभाकररावसावरकर.

परसबागेतसुद्धा विविध वृक्ष : सावरकरयांना वृक्षांची आवड आहे. घराच्या मागील भागात असलेल्या परसबागेत बेल, बंगाली पान, नायझेरियन चिंच, गुजराती बोर यासह अन्य वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष या परसबागेत पाहायला मिळतात. तसेच शेणामातीच्या सारवणाने खास पद्धतीत तयार झालेली झोपडी, झुला असे सर्व एखाद्या शेतातील वातावरणाप्रमाणे वातावरण निर्मिती सावरकर यांनी शहरात तेही आपल्या घरात केली आहे.