आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवादाच्या माध्यमातून बंद झाला तंबाखू विक्रीचा व्यवसाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मन परिवर्तनासाठी निंभी येथील शिक्षक चौहान यांनी घेतला पुढाकार - Divya Marathi
मन परिवर्तनासाठी निंभी येथील शिक्षक चौहान यांनी घेतला पुढाकार
दिग्रस : ढकलगाडीवर गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीला संवादाच्या माध्यमातून व्यवसाय बंद पाडून त्याच गाडीवर चक्क भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कार्याची पावती म्हणून शिक्षक आमीन चौहान यांना यवतमाळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  
दिग्रस तालुक्यातील निंभा येथील मोहन महाराज गावात ढकलगाडीवर चक्क गुटखा पुडी विकण्याचा व्यवसाय करत होते. बऱ्याचवेळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ मुलांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थांसोबत ते गाडीवर गुटखा पुड्या विक्री करत होते. ही बाब शाळेतील शिक्षक आमीन चौहान यांच्या लक्षात आली. शाळेजवळ १०० मीटर परिसरात गुटखा विक्री बंदीचा नियम आहे. मात्र, हा नियम बहुसंख्य ठिकाणी पाळला जात नसल्याची चौहान यांना कल्पना होती.
 
 मात्र, कुठल्याही प्रकारची तमा बाळगता ढकलगाडीवर इतर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करावा, असा सल्ला शिक्षक आमीन चौहान यांनी दिला. हा सल्ला मोहन महाराज यांनी दैनंदिन जीवनात अंमलात आणला. आणि गेल्या काही दिवसांपासून ढकलगाडीवर त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 
 
विशेष म्हणजे त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शिक्षक चौहान नेहमी त्यांच्याकडून भाजीपाला खरेदी करतात. एका छोट्याशा गोष्टीतून किती मोठे बदल होऊ शकतात, हे यावरून सिद्ध होत आहे. 
 
भाजीपाला विक्रीतून समाधान मिळते 
- गुटख्यासारखं जहर विक्री बंद करून मी समाजाला पौष्टिक भाजीपाला विकत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी व्यवसाय आवश्यक आहे. गुटखा विक्री करण्यापेक्षा भाजीपाला विक्रीच्या व्यवसायामुळे आत्मिक समाधान मिळत आहे.
 मोहनमहाराज, नागरिक. 
 
बातम्या आणखी आहेत...