आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPS Meera To Play Main Role In Yakub Memon Hanging

या ‘मर्दानी’च्‍या देखरेखि‍त होणार याकूबला फाशी, SEX रॅकेट पकडून प्रकाशझोतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरा बोरवणकर - फाइल फोटो - Divya Marathi
मीरा बोरवणकर - फाइल फोटो
नागपूर - वर्ष 1993 मध्‍ये मुंबईमध्‍ये बॉम्‍बब्लास्टचा प्रमुख सूत्रधार याकूब मेमन याची याचिका राज्‍यपालाने फेटाळली तर 30 जुलैला त्‍याला फाशी होऊ शकते. दरम्‍यान, त्‍याच्‍या फाशीच्‍या देखरेखीची जबाबदारी अॅडिशनल डायरेक्टर जनरल (कारागृह‍) मीरा बोरवणकर यांच्‍यावर सोपवण्‍यात आली असून, त्‍या नागपूरला पोहोचल्‍या आहेत. त्‍यांच्‍या कार्यावर ‘मर्दानी’ हा चित्रपटही आला होता. मेमन याच्‍या फाशीला अजूनही सहा दिवस शिल्‍लक आहेत. त्‍या अनुषंगाने अनेक पोलिस दलातील अनेक वरिष्‍ठ अधिकारी नागपूरमध्‍ये दाखल झाले आहेत.
जळगावमध्‍ये सेक्स रॅकेट पकडल्‍याने मीरा प्रकाशझोतात
वर्ष 1994 जळगाव जिल्‍ह्यातील एक मोठे सेक्स रॅकेट पकडण्‍यात आले होते. यामध्‍ये शालेय विद्यार्थिपासून ते महाविद्यालयीन युवतींना वेश्‍या व्‍यवसायात आणले जात होते. हा प्रकार उघडकीस आणण्‍यास मीरा यांचे मोठे योगदान आहे. या कारवाईमुळे मीरा या देशभर प्रकाशझोतात आल्‍या होत्‍या. तोच धागा पकडून गतवर्षी ‘मर्दानी’ हा चित्रपटसुद्धा आला होता. यात राणी मुखर्जी यांनी मीरा यांची भूमिका साकारली होती.
1981 बॅचची आयपीएस अधिकारी आहे मीरा
पंजाबमधील फाजिलका जिल्‍ह्यात मीरा यांचे मूळ गाव आहे. त्‍या 1981 बॅचच्‍या आयपीएस ऑफिसर आहेत. त्‍यांचे पती अभय बोरवणकर हेसुद्धा भारतीय प्रशासकीय सेवा(IAS) मध्‍ये होते. काही काळ नोकरी केल्‍यानंतर त्‍यांनी राजीनामा दिला. आता ते उद्योग क्षेत्रात आहेत.
वडील होते सैन्‍यदलात
मीरा यांचे वडील ओ.पी.चड्ढा बॉर्डर सिक्यूरिटी फ़ोर्स(BSF) मध्‍ये होते. त्‍यांची पोस्टिंग फाज़िलकामध्‍ये होती. मीरा यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण फाज़िलकामध्‍ये झाले. त्‍यानंतर 1971 में त्‍यांच्‍या वडिलांची जालंधर येथे बदल झाली. त्‍यामुळे जालंधर येथे मीरा यांनी पुढील शिक्षण घेतले.
पुढील स्‍लाइडवर पाहा मीरा यांचे आणखी फोटाे....