आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घोटाळा: चौकशीचा अहवाल सादर करा, नागपूर खंडपीठाने राज्‍याला सुनावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी अत्‍यंत कासवगतीने होत असून, सिंचन घोटाळा प्रकरणी चौकशीचा प्रगती अहवाल सादर करण्‍यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्‍या नागपूर खंडपीठाने राज्‍याला शेवटची संधी आहे. राज्‍यातील सिंचनाची प्रगती आणि ऑडिटच्‍या कामासंदर्भात न्‍यायालयाने तोंडी विचारणा केली आहे. नागपूरातील जनमंच संस्थेने यासंदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी अथवा विशेष तपास पथकाची नियुक्ती व्हावी, दोषी अधिकार्‍यांकडून भ्रष्टाचाराची पूर्ण रक्कम वसूल करावी, त्यांच्यावर कारवाई करावी, कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्या खर्चातूनच सदोष कामांची पुन्हा दुरुस्ती करून घ्यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.
महाघोटाळा विदर्भातच : गोसेखुर्दसह विदर्भातील 38 प्रकल्प चौकशीच्या रडारवर आहेत. यापैकी 30 प्रकल्पांना फक्त चार दिवसांत मंजुरी दिली होती. विशेष म्हणजे 2009 साली फक्त सात महिन्यांत विदर्भातल्या या 38 प्रकल्पांची किंमत 6 हजार 672 कोटींवरून थेट 26 हजार 722 कोटींवर गेली होती.
बातम्या आणखी आहेत...