आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांनी प्रेमानंतर केले लग्न मात्र बजरंग दलाने ठरवले \'लव्ह जिहाद\', मग तरूणाने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- बजरंग दलाच्या इशाऱ्यावर नागपूर पोलिसांनी आपल्याला आणि कुटुंबाला अवैधरित्या पोलीस ठाण्यात बसवून ठेवून आपला छळ केल्याची तक्रार करणारी याचिका आंतरधर्मीय विवाह करणारया एक मुस्लिम युवकाने उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर न्यायालयाने राज्य शासन, नागपूर पोलीस आयुक्त आणि इमामवाडा पोलीस ठाणे यांना नोटीस बजावली आहे.
 
मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील या युवकाने नागपुरातील हिंदू युवतीशी मुस्लिम पध्दतीने निकाह केला. त्यासाठी तिने धर्मांतरण केले. मात्र या विवाहाला युवतीच्या कुटुंबाचा विरोध आहे. दरम्यान, ही बाब बजरंग दलाला कळताच त्यांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचे स्वरूप देत पोलिसात तक्रार केली होती. 
 
इमामवाडा पोलिसांनी त्या मुस्लिम युवकासह त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. दरम्यान, आता या युवकाने उच्च न्यायालयात धाव घेतली असून बजरंग दलाच्या सांगण्यावरून पोलीस त्रास देत असल्याचा त्याचा आरोप आहे. त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. मागील काही दिवसांपासून नागपुरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
 
बातम्या आणखी आहेत...