आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायरान जमिनीच्या वादातून तिघांवर प्राणघातक हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर दर्यापूर येथील रुग्णालयासमोर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. - Divya Marathi
घटनेनंतर दर्यापूर येथील रुग्णालयासमोर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
दर्यापूर- शहरापासून अवघ्या किमी. अंतरावर असलेल्या शिवर ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यासह शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी कुऱ्हाडीने हल्ला करत जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १७) सकाळी ११ च्या सुमारास घडली. जखमी अवस्थेतील तिघांना उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले आहे. खंडेराव पातुर्डे, संतोष चंदन पंचायत समितीचे उपसभापती संजय देशमुख अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मागील काही वर्षांपासून शिवर येथील गावाबाहेर चंद्रभागा नदीच्या काठावर असणाऱ्या गायरान जमिनीवर काही नागरिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे. ज्यांनी या गायरान जमिनीवर अतिक्रमणे केले आहे, त्यांनी मागील एक दोन वर्षांपासून या जमिनीवर शेतकी करणे सुरू केले.
गुरांंना चराईसाठी शिवर ग्रामपंचायतीच्या मालकीचे गायरान गावा बाहेर असून गायरान जागा असल्यामुळे गावातील गुरे येथे चराईकरिता येत असत. मात्र या गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी गुरांच्या चराईसाठी देखील ग्रामस्थांना विरोध केला. बुधवारी सकाळी त्या गायरान असलेल्या ठिकाणी गावातील गुरे घेऊन काही शेतकरी गुराख्यासह गेले असता तेथील अतिक्रमणधारक पुरुष महिलांनी येथे गुरे चारू नका म्हणून वाद घातला.
बघता बघता शाब्दिक चकमक होऊन वाद विकोपाला गेला. त्यातच अतिक्रमणधारकांनी दरम्यान घटनेच्या दिवशी एक गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी म्हणून या गायरान जमिनीकडे घेऊन गेला, तर अन्य काही शेतकरीही काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी गुराख्यासह शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकून कुऱ्हाडीने लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पंचायत समितीचे उपसभापती संजय देशमुख यांच्यासह दोन शेतकरी गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच शिवर येथील रहिवासी असलेले उपसभापती संजय देशमुख घटनास्थळी गेले असता त्यांच्या डोळ्यातही मिरची पूड फेकून काठीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेतकरी खंडेराव पातुर्डे, संतोष चंदन देशमुख गंभीर जखमी झाले. तर काहींना किरकोळ मार लागला. दरम्यान जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर गंभीर अवस्थेतील तिन्ही जखमींना अमरावती येथे हालविण्यात आले.
या प्रकरणी दोन्ही गटातील मंडळी दर्यापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. फिर्यादी मनोज देशमुख यांच्या तक्रारीवरून प्रल्हाद पवार, अनिल पवार, देविदास चव्हाण, पंजाब चोरपगार, शोभा चोरपगार, कांता पवार, वनमाला चोरपगार यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून रात्री उशिरा जखमी तिघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शिवसैनिकांची गर्दी : जखमी झालेले उपसभापती संजय देशमुख हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याने घटनेची माहिती मिळताच बाळासाहेब हिंगणीकर, सुनील डीके, रवि गणोरकर, बाजार समिती संचालक गोपाल अरबट, भैय्या बरवट यांच्यासह ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जखमींचा Photos....
बातम्या आणखी आहेत...