आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावंडे ले-आऊटमधील दोन अपार्टमेंटच्या भिंतीला तडे,नाल्याच्या पाण्यामुळे आेढवले संकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गावंडे ले-आऊटमधील अपार्टमेंटच्या संरक्षण भिंतीला गेलेले तडे. - Divya Marathi
गावंडे ले-आऊटमधील अपार्टमेंटच्या संरक्षण भिंतीला गेलेले तडे.
अमरावती- नाल्याच्या पाण्यामुळे गावंडे ले-आऊटमधील दोन अपार्टमेंट धोक्यात आली आहेत. नाल्याच्या काठावर असल्याने दोन्ही अपार्टमेंटमधील तब्बल १२ कुटुंबियांना तत्काळ फ्लॅट खाली करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. शिवाय या सदनिका निर्माण करणाऱ्या बिल्डर्संना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

सातूर्णा परिसरात गावंडे ले-ऑऊटमध्ये नाल्या काठावर नंद यशोदा बिहाऊ अॅपार्टमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. नाल्याच्या काठावर असल्याने मजबूत संरक्षण भिंत निर्माण करणे गरजेचे हाेते. मात्र संरक्षण भिंत कमकुवत असल्याने नाल्याला आलेल्या पुराने दोन्ही अपार्टमेंटला चांगलेच तडे गेले आहे. अपार्टमेंटच्या सरंक्षण भिंतींसह विविध भागात तडे गेले आहे. माती खचल्याने अपार्टमेंटचा काही भाग कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. सातुर्णा परिसरातून वाहणारा नाला गावंडे ले-आऊट मधून जातो. नाल्याच्या पुरामुळे अपार्टमेंटच्या बाजूला असलेला मातीचा भाग वाहून गेला. कमकुवत संरक्षण भिंत नाल्याचे पाणी अडवू शकली नाही. संरक्षण भिंत पार करीत नाल्याचे पाणी दोन्ही सदनिकेमध्ये शिरले. अपार्टमेंटमध्ये पाणी शिरल्याने अपार्टमेंट कोसळण्याची स्थिती निर्माण झाली. अपार्टमेंटच्या आजू-बाजूची जमीन खचल्याने भिती निर्माण झाली . या दोन्ही सदनिकेमध्ये तब्बल १२ कुटुंब राहतात. नाल्याच्या काठावर असल्याने पुराच्या पाण्याचा जोर लक्षात घेता कोणतीही जिवीत वित्त हानी होऊ नये म्हणून या कुटुंबांना प्लॅट खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. महापालिकेच्या निवाऱ्यात आश्रय घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेकडून बिल्डर्सना नोटीस
नंद यशोदा अपार्टमेंटचे निर्माण बिल्डर्स नितीन सबनीस पंकज घाटे यांनी केले आहे. याच ले-आऊटमधील बिहाऊ अपार्टमेंटचे निर्माण श्रुती अग्रवाल या बिल्डर्सकडून केले आहे. अपार्टमेंटची तातडीने दुरुस्ती करण्याची नोटीस मनपाकडून या दोन्ही बिल्डर्सला बजावल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली.

पुढील स्लाइड्सवर, वाचा मनपाने दिलेली नोटीस...
बातम्या आणखी आहेत...