आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंतनाशक गाेळीतून निघाला चक्क काचेचा तुकडा; विद्यार्थ्यांना बाधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर बाजार- राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाटण्यात आलेल्या गोळ्यांमुळे येथील नगर परिषद उर्दू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थी अशी गोळी खाणार नाही म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोळीची पूड करून घेण्यास सांगितले असता, चक्क एका गोळीतून काचेचा तुकडा निघाला. याबाबत पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.
जंतनाशक गोळीत काच निघाल्याने पालकांबरोबरच शिक्षकांचीही चिंता वाढली अाहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जंतनाशक गोळ्या द्यायच्या की नाही,असा प्रश्न निर्माण झाला आहे. जंतनाशक दिनानिमित्त अलबेन्डॉझोल गोळ्यांचे वितरण केले. नगर परिषद उर्दू शाळेतील शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना बुधवारी या गोळ्यांचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी या गोळ्या घरी जाऊन रात्री जेवणानंतर सेवन केल्यात. काही विद्यार्थ्यांना उलटी होणे, पोट दुखणे, मळमळणे, असा त्रास व्हायला लागला. पालकांनी लगेच आपापल्या मुलांना खासगी शासकीय दवाखान्यामध्ये दाखल केले. विद्यार्थ्यांची प्रकृती बरी असली, तरी पालकांनी शिक्षकांनी या गोळ्यांबाबत धास्ती घेतली आहे.

वैद्यकीयअधीक्षकांकडे केली तक्रार : गोळीतकाच निघाल्याचा काही पालकांचा निरोप बुधवारी रात्री मिळाला. त्याची शहानिशा करण्यासाठी गुरुवारी (दि. ११) शाळेत काही गोळ्यांचा चुरा करून पाहिला असता, त्यातून काचेचे तुकडे निघाले. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे, असे न. प. उर्दू शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शहाजद खाँ अहमद खाँ यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.