आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एफडीए’मध्ये टाकला गुटखा, जिल्ह्यातील गुटखा हद्दपार न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आमदार बच्चू कडू यांनी परतवाडा परिसरातून गुटखा आणला आणि हाच गुटखा शहरातील अन्न औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात टाकला. पंधरा दिवसाच्या आतमध्ये जिल्ह्यातील गुटखा विक्री पूर्णपणे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आमदार कडू यांनी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना सोमवारी (दि. १) दिला आहे.

महिनाभरापूर्वी महसूल विभागाने शहरात एकाच ठिकाणाहून तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. मात्र या कारवाईमुळे गुटखा विक्रीवर काहीही परिणाम झालेला नाही. दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी परतवाडा भागातून सोमवारी (दि. १) मोठ्या प्रमाणात गुटखा आणला. राज्यात गुटखा बंदी असतानाही सर्रास गुटखा विक्री गुटख्याची वाहतूक सुरूच आहे. मात्र तरीही अन्न औषध प्रशासनाकडून गुटखा विक्रीवर अंकुश लावला जात नाही. वारंवार आंदोलन, महसूलची कारवाई होवूनसुध्दा ‘एफडीए’च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गुटखा विक्रेत्यांविरुध्द कारवाई केलेली नाही. दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी परतवाडा भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला.
हा गुटखा ‘एफडीए’चे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या कक्षात तसेच त्यांच्या टेबलवर ठेवून त्यांना दाखवला. आगामी पंधरा दिवसात जिल्ह्यात गुटखा विक्री पुर्णपणे बंद झालीच पाहीजे. जर गुटखा विक्री बंद नाही झाली तर आम्ही स्वत: गुटखा जप्त करून आणू आणि कार्यालयात टाकणार, पूर्ण कार्यालय गुटख्याने भरून टाकणार. याच कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना डांबून ठेवू, असेही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना सुनावले. यावेळी छोटू महाराज वसू यांच्यासह प्रहारचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...