आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरबळीप्रकरणी धामणगाव कडकडीत बंद, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे- तालुक्यातील पिंपळखुटा येथील नरबळी प्रयत्नाचा निषेध या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी,या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १९) विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या धामणगाव बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला.

पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज आश्रम शाळेतील प्रथमेश सगणे अजय वनवे या दोन विद्यार्थ्यांवर नरबळी देण्याच्या उद्देशाने जीवघेणे वार करण्यात आले. या प्रकरणाचा निषेध म्हणू शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान प्रथमेशच्या उपचाराचा खर्च शासनाने उचलावा, त्याच्या पालकांना १० लाख रुपयांची मदत करावी आदी मागण्या या वेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. शास्त्री चौकातून काढण्यात आलेला मोर्चा शहराच्या विविध भागातून तहसील कार्यालयावर धडकला. तहसील परिसरात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेमध्ये आश्रमशाळेत घडलेेल्या प्रकाराचा निषेध करण्यात आला. बंदला प्रतिसाद देत शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मोर्चाचे आवाहन नरबळी विरोधी कृती समिती, लहुजी शक्ती सेना, शिवसेना, मनसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती संघटनांसह शहरातील विविध संघटना सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चोखपोलिस बंदोबस्त :
मार्चादरम्यानकोणताही अनुचित प्रकार घडून नागरिकांच्या भावनांना ठेच पोहोचू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...