आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाव तहसीलमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान, नाझरसह दोन शिपाईही झाले निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महागाव- महागाव शहरातील तहसील कार्यालयातील दोन वेगवेगळ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. याप्रकरणी महागावचे तहसीलदार सी. एन. कुंभलकर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून नायब नाझर गजानन तलवारे, शिपाई गजानन तगडपल्लेवार, विजय आंभोरे, यांना निलंबित करण्यात आले आहे.

महागाव तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण झाले. आमदार राजेंद्र नजरधने यांच्यासह विविध गणमान्य पदाधिकारी, अधिकारी, नागरिक हजर होते. तहसीलदार कुंभलकर यांनी ध्वजारोहणाची प्रक्रिया सुरू केली असता ध्वज काही फूट उंचीवर जाताच राष्ट्रध्वज उलटा बांधण्यात आल्याची बाब उपस्थितांच्या निर्दशनास आली. त्यामुळे राष्ट्रध्वज तातडीने खाली घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रध्वज व्यवस्थित बांधून ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी आमदार नजरधने यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याचा प्रसंग टळला असून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान शासकिय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या इमारतीत सध्या कामकाज सुरू असलेल्या तहसील कार्यालयातही सकाळी तहसीलदार कुंभलकर यांच्या हस्ते फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या या दोन्ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या होत्या. या घटनेचे पडसाद लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात उमटले. उपविभागीय अधिकारी नितिनकुमार हिंगोले यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान या घटनेच्या तपासासाठी प्रकाश शेळके आणि त्यांचा ताफा तहसील कार्यालयात धडकला.

राष्ट्रध्वजाची देखभाल ठेवण्याची जबाबदारी नायब नाझर गजानन तलवारे आणि शिपाई गजानन तगडपल्लेवार, विजय आंभोरे यांच्यावर होती. परंतू त्यांनी कर्तव्यात हयगई केल्यामुळे त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी नितिनकुमार हिंगोले हे दुपारी महागाव येथे पोहचले त्यांनी फाटलेला ध्वज खाली उतरून नव्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले. झालेल्या प्रकार दुर्दैवी गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान राष्ट्रध्वजाच्या अवमानप्रकरणी जगदीश नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसीलदार कुंभलकर यांच्याविरुद्ध राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ कलम नुसार कारवाई करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...