आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर,मनपाच्या व्यापारी संकुलांना पार्किंगचे वावडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नियोजनशून्यतेमुळे शहरातील पार्किंगचा यक्षप्रश्न निर्माण झाला असून,पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहने लावावी तरी कोठे, अशी नागरिकांची अवस्था होत आहे. मनपासह काही व्यापारी संकुलांना पार्किंगच नसल्याने वाहनांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. वाहनांमुळे रस्ते अरुंद होत असल्याने अनेकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ येत आहे.
शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, सद्य:स्थितीत असलेली पार्किंग अपुरी पडत आहे. वाढती लोकसंख्या तसेच वाहनांची गर्दी लक्षात घेता शहरातील पार्किंगचे नियोजन प्रशासनाकडून होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाकडून पार्किंग समस्येकडे गंभीरतेने लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील पार्किंगची समस्या आज गंभीर बनली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहने ठेवण्यासाठी रस्त्यावर जागाच मिळत नाही. महापालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागादेखील गिळंकृत करण्यात आल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शहरात पार्किंगची समस्या आणखी तीव्र होत आहे. शहराच्या हृदयस्थानी असलेल्या कापड तसेच अन्य मार्केटमध्ये पश्चिम विदर्भच नाही, तर राज्याच्या अनेक भागातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. असलेली पार्कींग नेमकीच फुल्ल राहत असल्याने अनेकांची गैरसोय होते. जागा अपुरी पडत असल्याने विविध भागातून आलेल्या वाहनचालकांना नेहरू मैदानाचा पार्किंगसाठी सहारा घ्यावा लागतो. महत्त्वपूर्ण रस्त्यांवरील दुकानांना पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने अनेक वाहने रस्त्यावर लावली जातात. काही रस्त्यांवर वाहने पार्किंग करण्यासाठी काही जागा सोडण्यात आली आहे. मात्र, त्यामागेदेखील वाहने लावली जात असल्याने रस्त्याने जाणाऱ्या अन्य वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. महापालिका प्रशासनाने दोन उड्डाणपुलाखालील
जागेत ‘पे अँड पार्किंग’ प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हक्काचे असलेल्या पार्किंगसाठी आता पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. उड्डाणपुलाची निर्मिती केल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने देखील अशा प्रकारे पार्किंगचे धाेरण राबवले नव्हते. मात्र, इतके दिवस महापालिकेला जाग का आली नाही.

पार्किंगगिळंकृत : अनेकव्यापारी संकुलांकडून पार्किंग गिळंकृत करण्यात आल्याचे वास्तव आहे. काही व्यापारी संकुलात तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्याचा स्लोप धोकादायक असल्याने ‘मौत का कुआं’ मध्ये वाहन चालवण्याचा अनुभव घेता येतो.
मनपाचेसंकुल पार्किंगविना : महापालिकेच्यास्वत:च्या व्यापारी संकुलात पार्किंग नसल्याची बाब समोर आली आहे.

पुढे काय? - जागांची निश्चिती
पार्किंगची समस्या निकाली निघावी म्हणून मनपाकडून विविध जागांची पाहणी केली जाणार आहे. जागा निश्चित झाल्यानंतर पार्किंगची समस्या निकाली निघण्याचा मार्ग मोकळा होईल.

मल्टिस्टेट स्टोअरेज पार्किंग विचाराधीन
दोन्ही उड्डाणपुलाखाली‘पे अँड पार्किंग’ आरंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील पार्किंगची समस्या निकाली निघावी म्हणून पदाधिकाऱ्यांसोबत विविध ठिकाणाची पाहणी केली जाणार आहे. काही ठिकाणे पार्किंग झोन म्हणून निश्चित केली जातील. शिवाय मल्टिस्टेट स्टोअरिंग पार्किंगचा देखील प्रस्ताव विचाराधीन आहे. हेमंतपवार, आयुक्त महापालिका.

पार्किंग झोनवर दुकानांचे अतिक्रमण
श्याम चौकातील नगर वाचनालयाच्या बाजूची जागा पार्किंग झोन म्हणून घोषित आहे. मात्र, या जागेवर दिवसभर दुकाने थाटली जातात, अशी उदाहरणे शहरात बघायला मिळतात.

व्यावसायिक इमारती
मनपा व्यापारी संकुल- 27
व्यावसायिक इमारती- 2141
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या नो पार्कींग झोन...
बातम्या आणखी आहेत...