आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरपीच्या शेतकऱ्याने फुकटात वाटला दीडशे क्विंटल कांदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- कांद्याचे घसरलेले दर खरेदीदाराच्या छटाईच्या मनमानी कारभारामुळे मुद्दलही निघत नसल्याने खरपी येथील अभिजित पोहोकार या शेतकऱ्याने तब्बल दीडशे क्विंटल कांदा गावकऱ्यांना फुकटात दिला. तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगाम हातातून गेल्यानंतर कांद्यावर आस लावून बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव घसरल्याने तिसरा जबर हादरा बसला आहे.
परतवाडा येथून जवळच असलेल्या खरपी येथील अभिजित रामराव पोहोकार यांच्याकडे बारा एकर शेत आहे. त्यापैकी पोहोकार यांनी दोन एकरांत कांदा पिकाची लागवड केली होती. खरीप रब्बी हंगामात जबर आर्थिक नुकसान सोसल्यानंतर ते भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी या दोन एकर कांद्यावर सुमारे एक लाख रुपये खर्च केला होता. सध्या कांदा काढणीला आला असून, त्यांनी अंदाजे दीड एकरातील कांदा उपडला होता. यापैकी २५ क्विंटल कांदा त्यांनी पाच हजार रुपयांना विकला. यासाठी त्यांना दोन रुपये प्रती क्विंटल कांद्याचा दर पडला. त्यातही खरेदीदाराने निवडून कांदा नेल्यामुळे पोहोकार यांना जबर आर्थिक फटका बसला. त्यानंतर उर्वरित दीडशे क्विंटल कांदाही त्यांना याच भावात छटाईच्या पद्धतीने खरेदीदाराने मागितला. सुमारे दोन रुपये किलोने कांद्यांची विक्री परवडणारी नसल्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना फुकटात कांदा घेऊन जाण्याचे सांगितले. पोहोकार यांच्याकडे असलेल्या बारा एकर शेतापैकी सुमारे नऊ एकराची संत्र्याची बाग आहे. या वर्षी संत्र्याचे भाव गडगडल्याने त्यांना अंदाजे बारा-तेरा लाख रुपयांची बाग केवळ चार लाख रुपयांना विकावी लागली होती. या व्यवहारातही त्यांना संत्रा बागेवरील खर्चही निघू शकला नव्हता. दोन एकरांत त्यांनी सोयाबीनचे पीक पेरले होते. परंतु, पाऊस गायब झाल्यामुळे त्यांना सोयाबीनचे पीक मोडावे लागले. याच दोन एकरांत त्यांनी कांद्याचे पीक घेतले होते. एकरभर पेरलेली मिरचीही रोगाच्या कचाट्यात सापडल्याने तीही कुचकामी ठरली होती. त्यांना दोन एकरांत झालेली दहा पोते तूर आठ हजार रुपये प्रती क्विंटल दराने विकली. दोन एकरांत झालेला तीस पोते गव्हापैकी त्यांनी चौदा पोते गहू १५२५ रुपये प्रती क्विंटल दराने विकला. त्यांना बारा एकरांवरील पिकासाठी सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्च आला. परंतु, हा खर्चही वर्षभरात निघू शकला नाही. दरम्यान, कांद्याचे किमान हजार रुपये भाव मिळतील अशी त्यांना आशा होती. परंतु, खरेदीदाराची मनमानी मिळणाऱ्या भावात कांदा विक्री परवडणारी नसल्यामुळे कंटाळून पोहोकार यांनी गावातील नागरिकांना कांदा फुकटात वाटून दिला.

कांदाउत्पादक हादरला : खरीपआणि रब्बी हंगामात झालेले नुकसान कांद्याच्या भावाने भरून निघेल या आशेने अचलपूर तालुक्यात या वर्षी विक्रमी कांद्याची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात सुमारे ११०० हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी तालुक्यात कांद्याचे क्षेत्र ७०० हेक्टर होते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात येते. दरम्यान, संध्या कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादकांवर नवीन संकट कोसळले आहे.

शेतातकांद्याला दोनशे रुपयांचा भाव : बाजारसमितीत चांगल्या दर्जाच्या कांद्याला सरासरी पाचशे ते सहाशे रुपये दर मिळत असले तरी शेतातून कांद्याची सरासरी दोनशे रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करण्यात येत आहे. त्यातही खरेदीदार कांद्याची छटाई करून खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा काढणीही परवडणारी नसल्याचे भीषण चित्र निर्माण झाले आहे.
बटाईदारहीअडचणीत : सिंचनाचीसोय असल्यानंतरही कांदा उत्पादनाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे बहुतांश शेती बटाईने दिली आहे. दोन हिश्श्याच्या करारावर बटाईदारांनी मोठ्या प्रमाणात या वर्षी कांद्यासाठी शेती बटाईने केली होती. यात मजूर, भूमिहीन शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. परंतु, सध्या भाव गडगडल्याने बटाईदारही भीषण आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

खर्चापेक्षा भाव कमी
दोनएकरशेतात डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड केली. उत्पादन अधिक व्हावे याकरिता रासायनिक खते कीटकनाशकांचा खर्चही केला, सिंचनाची व्यवस्था केली याकरिता एकरी ४० हजार रुपयांच्या वर खर्च केला. परंतु, कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे झाले आहे. पुरुषोत्तम भुसारी, सालेपूर.

म्हणून दर झाले कमी
बाजारातकांद्याचीआवक वाढल्याने आंध्र प्रदेश नागपूर येथील खरेदीदारांनी दर कमी केले. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. चंद्रकांत गणोरकर, कांदाव्यापारी.
साठवणूक फायद्याची
भावाची अस्थिरता कायम
अचलपूरतालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेण्याकरिता खर्च केला जेणेकरून वाढलेल्या भावाचा फायदा होईल शेतकऱ्यांना प्रती किलो १५ ते १६ रुपये या भावाची अपेक्षा आहे. त्यांना मात्र ते रुपये किलोने कांदा विकावा लागत आहे.

शेतकऱ्यांनीकांदासाठवणूक करून योग्य भाव मिळाल्यावर कांद्याची विक्री केल्यास त्याला चांगला फायदा होऊ शकतो. एस. बी. जाधव, तालुकाकृषी अधिकारी ,अचलपूर.
-अचलपूर तालुक्यात २०१५-१६ मध्ये कांद्याचे क्षेत्र - ११०० हेक्टर
-२०१४-१५ मधील लागवडीखालील क्षेत्र - ७०० हेक्टर
-शेतकऱ्यांना शेतात मिळणारा सध्याचा दर - २०० रुपये प्रती क्विंटल
-कांद्याचे सरासरी एकरी उत्पादन - ८० ते १०० क्विंटल
-कांद्याचा एकरी सरासरी खर्च - ४० ते ५० हजार रुपये
खरपी येथील अभिजित पोहोकार यांनी त्यांच्या शेतात मजूर लावून काढलेला कांदा भाव घसरल्याने गावकऱ्यांना फुकटात वाटावा लागला.