आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडिओलॉजिस्टच्या राज्यव्यापी संपाची रुग्णांना नाहक 'शिक्षा'!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गर्भधारणापूर्व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) गर्भलिंग निदान करणारा कारकुनी चूक करणाऱ्यालाही असलेल्या सारख्याच शिक्षेची जाचक अट रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शहरातील रेडिओलॉजिस्टचा सोमवारपासून (दि. २०) राज्यव्यापी संप सुरू झाला आहे. मात्र, या संपामुळे संबंधित विविध आजारांच्या तपासण्या होऊ शकल्यामुळे रुग्णांचे पुढील उपचार रखडले आहेत. त्यामुळे स्वत:च्या शिक्षेची असलेली जाचक अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाची शहरातील असंख्य रुग्णांना ‘शिक्षा’ मिळाल्यामुळे प्रचंड आर्थिक, शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

पोटदुखीसह अनेक महत्त्वाच्या आजारांचे अचूक निदान करण्यासाठी सोनोग्राफी महत्त्वाची असते. मात्र, शासनाने ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यांतर्गत केलेल्या जाचक अटींमुळे आम्हाला काम करणे अशक्य आहे, असा आरोप करून राज्यातील रेडिओलॉजिस्ट संघटनेसोबतच अमरावती रेडिओलॉजिस्ट असोसिएशनने १४ जूनला एकदिवसीय संप पुकारला होता. मात्र, १९ जूनपर्यंत त्यांची मागणी मान्य झाल्यामुळे २० जूनपासून शहरातील सर्वच रेडिओलॉजिस्टनी सोनोग्राफी काढण्याचा आंदोलक निर्णय घेतला. वास्तविकता पीसीपीएनडीटी कायद्यातील रेडिओलॉजिस्टच्या दृष्टीने त्रासदायक असलेल्या त्रुटी दूर करणे ही रेडिओलॉजिस्टची मागणी थेट केंद्र शासनाकडे आहे. मात्र, या संपामुळे सर्वसामान्य रुग्णांना नाहक फटका बसत आहे. सोमवारपासून शहरातील खासगी रेडिओलॉजिस्टसोबतच जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) रेडिओलॉजिस्टसुद्धा संपावर गेले आहे. त्यामुळे डफरीनमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वास्तविकता शासकीय रुग्णालयात तरी ही गैरसोय व्हायला नको, अशी अपेक्षा रुग्णांनी त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. मात्र, डफरीनमध्ये असलेले रेडिओलॉजिस्ट हे कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनीसुद्धा सोनोग्राफी करण्यास नकार दिला आहे. खासगी डफरीनच्या रेडिओलॉजिस्टनी
सोनोग्राफीला नकार दिल्यामुळे गर्भवती स्त्रिया, पोटांचे, मूत्रपिंड, यकृतासह अन्य अवयवांशी संबंधित आजार असल्यास डॉक्टरांना सोनोग्राफीच्याच मदतीने रुग्णांवर उपचार करावे लागतात. मात्र, सध्या सोनोग्राफी होत नसल्यामुळे रुग्णांवरील उपचारात खोळंबा निर्माण झाला असून, मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात जवळपास ४० खासगी रेडिओलॉजिस्ट असून, त्यांच्या संपामुळे मोठा फटका रुग्णांना बसत आहे.

कायम्हणतात अमरावती रेडिओलॉजिस्ट असोसिएशन
तर सोनोग्राफीसोबत इतरही तपासण्या बंद करू : सोनोग्राफीकरण्यावर बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. कारण पीसीपीएनडीटी कायद्यात असलेली तरतूद गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला जी शिक्षा (किमान वर्ष) आहे, तीच ऑनलाइन माहिती भरताना एखादी अनवधानाने किरकोळ चूक झाली त्या डॉक्टरांनाही आहे. वास्तविकता आम्ही रुग्णांना रात्री-बेरात्री सेवा देतो. या कायद्यातील तरतुदीनुसार गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यापूर्वी संबंधित रेडिओलॉजिस्टला त्या महिला रुग्णाची संपूर्ण माहिती १९ कॉलममध्ये भरावी लागणार आहे. यामध्ये किरकोळ चूकसुद्धा गुन्हा ठरत आहे. तसेच पुण्यातील रेडिओलॉजिस्टवर झालेली कारवाई ही सूडपणाची आहे. दरम्यान, आम्ही १४ जूनला एक दिवस बंद ठेवला होता. आमच्या राज्य राष्ट्रीय स्तरावरील संघटना शासनासोबत चर्चा करत आहे, मात्र शासनाकडून अजूनही सकारात्मक निर्णय आला नाही. म्हणून राज्यातील सुमारे दोन ते तीन हजार रेडिओलॉजिस्ट बुधवारी (दि. २२) मुंबईत धडक देणार आहे. या चर्चेदरम्यान आमची मागणी निकाली निघाल्यास सोनोग्राफीसोबतच एक्सरे किंवा इतर तपासण्यासुद्धा आम्ही बंद करणार आहोत. त्या कधीपासून बंद करायच्या याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

एखादा रेडिओलॉजिस्ट गर्भलिंग निदान चाचणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. अमरावतीत असे असेल तर आम्ही त्याला पुढे आणू, मात्र इतर चुकांसाठी पीसीपीएनडीटीतील अटी जाचक असल्याचे मंगळवारी (दि. २१) झालेल्या पत्रकार परिषदेत अमरावती रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सांगत होते.

या वेळी अध्यक्ष डॉ. उमेश देशमुख, डॉ. हरीश राठी, डॉ. जयभारत पाटोडे, डॉ. नितीन गावंडे, डॉ. पंकज घुंडीयाल, डॉ. रवींद्र कलोडे, डॉ. संध्या कोठारी, डाॅ. मनीष राठी, डॉ. मनीष कहार, डाॅ. राज सोळंकी, डॉ. सचिन बिजवे यांच्यासह शहरातील इतरही रेडिओलॉजिस्ट हजर होते.
पीडीएमसीमध्ये सोनोग्राफीच्या रुग्णांमध्ये वाढ
खासगीरेडिओलाॅजिस्टनीसोनोग्राफीसाठी संप पुकारला असला तरी आमच्या रुग्णालयात सोनोग्राफी सुरूच आहे, सुरू राहणार आहे. आमच्याकडे दरदिवशी सरासरी ३० ते ३५ रुग्णांची सोनोग्राफी केली जाते. मात्र, मंगळवारी आमच्याकडे जवळपास ५० रुग्णंाची सोनोग्राफी झाली आहे. उद्यापासून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. डॉ. सोमेश्वर निर्मळ, वैद्यकीयअधीक्षक, पीडीएमसी.

डफरीनमधील सोनोग्राफी बंद; रुग्णांची गैरसोय
कार्यरतअसलेले रेडिओलॉजिस्ट कंत्राटी असल्याने त्यांनीही सोनोग्राफीस नकार दिला. त्यांनी काम सुरू ठेवावे याबाबत आम्ही चर्चा केली, मात्र नकार दिला. आमच्याकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. डॉ. संजय वारे, वैद्यकीयअधीक्षक, डफरीन रुग्णालय.

रुग्णांचा विचार करावा
^रेडिओलॉजिस्टनीकेलेलीमागणी रास्त असेलच. मात्र, आंदोलन करताना रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घ्यावीे. त्या दृष्टीने शहरात किमान एक केंद्र तरी सोनोग्राफीसाठी खुले ठेवावे, असे आपले वैयक्तिक मत आहे. इर्विनमध्ये सोनोग्राफी सुरूच आहे. डॉ. अरुण राऊत, जिल्हाशल्यचिकित्सक.

इर्विनमध्ये सोनोग्राफी सुरू
^रुग्णालयातसोनोग्राफी सुरू असल्यामुळे रुग्णांच्या दृष्टीने दिलासादायक आहे. इर्विनमध्ये दररोज सरासरी ४० रुग्णांच्या सोनोग्राफी केल्या जातात. ही संख्या संपामुळे वाढणार आहे. आकस्मिक रुग्णांसाठी २४ तास सोनोग्राफीची सेवा उपलब्ध आहे. डॉ. अजय कडुकार, रेडिओलॉजिस्ट,इर्विन.

गैरसोय आणि आर्थिक फटका
अनेक रुग्ण विविध आजार झाल्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहे. अनेक आजारांवर सोनोग्राफी रिपोर्टशिवाय डॉक्टरांना पुढील उपचार करणे शक्य नाही. मात्र, सोनोग्राफी बंद असल्यामुळे त्या रुग्णांना नाहक डॉक्टरांकडे राहावे लागत आहे. अशा वेळी त्याला रुग्णालयात राहण्यासाठी लागणारे शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे गैसोयीसोबतच आर्थिक फटकासुद्धा सोसावा लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...