आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकमल उड्डाणपुलाचे पुनर्निर्माण,अनेक ठिकाणी पडल्या भेगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या अमरावती ते बडनेरा रेल्वे लाईनवरील राजकमल चौक रेल्वे उड्डाणपुलाला सध्या अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, पिंपळ इतर झाडे उगवल्याने पुलाचे दगड खिळखिळे झाले आहेत. दरम्यान, महाड पूल अपघाताच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा जुन्या या उड्डाण पुलाची क्षमता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासली जाणार आहे. जीर्ण पुलाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने नवीन पूल बांधकामाच्या हालचाली सुरू केल्या असून, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नवीन पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून वीस कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

शहरातील महत्वपूर्ण चौकांना जोडणाऱ्या या उड्डाण पुलाची निर्मिती सुमारे ५० वर्षांपूर्वी करण्यात आली. हा उड्डाणपूल शहरातील अत्यंत जुना असून, अनेक ठिकाणी शिकस्त झाल्याने या पुलाची क्षमता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासली जाणार आहे. काँग्रेेस नगरच्या दिशेने हमालपुरा तर जयस्तंभ चौक तसेच रेल्वे स्टेशन च्या दिशेने उड्डाणपूल उतरतो. एकाच उड्डाणपुलावरून विविध दिशेने जाता येणे शक्य असल्याने शहरात या पुलाचे महत्व अधिक आहे. रेल्वे स्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या शहरातील नागरिकांना रेल्वे स्थानकाकडे जाता यावे तसेच नवीन शहरातील नागरिकांना अंबा देवीचे मंदिर तसेच बाजारपेठेत येता यावे म्हणून या उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली होती. अमरावती ते बडनेरा रेल्वे मार्गामुळे दुभागलेल्या शहराला जोडणारा हा उड्डालपूल महत्वपूर्ण दुवा आहे. अत्यंत जुना असल्याने उड्डाणपूल अनेक ठिकाणी जीर्ण झाल्याचे निदर्शनास येत आहे. पुलाच्या मुख्य भिंतीवर दोन्ही बाजूने मोठ-मोठी झाडे वेली उगवल्या आहेत. पुलाचे बांधकाम दगडी फाड्यांना रचून करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी दगडी फाड्यांमधील भेगा रेती- सिमेंटची छपाई करीत बुजविण्यात आली होत्या. मात्र सद्यस्थितीत अनेक ठिकाणी दगडांना भेगा पडल्या आहेत. दगडांच्या या भेगांमधून माती निघून जात पूल पोकळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम देखील काही ठिकाणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. दगडाने बांधलेला असल्याने आजू-बाजूने पूल मजबूत वाटत असला तरी अनेक ठिकाणी क्षतीग्रस्त झाला आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मितीची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

२०कोटींचा प्रस्ताव : राजकमलचौकातील उड्डाण पुलाची नव्याने निर्मिती करता यावी म्हणून पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी केंद्रीय मार्ग योजनेतून (सीआरएफ) पुलाच्या निर्मितीसाठी २० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

पुलाच्याभिंतीला भेगा : अंबापेठयेथून जयस्तंभ चौकाकडे जाणारा उड्डाणपुलाखालील रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाच्या भिंतीला अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. दगडी फाड्या एकमेकांपासून अत्यंत दूर गेल्याचे निदर्शनास येते. शिवाय या भेगांमध्ये पक्ष्यांनी घरटे निर्माण केले आहेत.

वाहनांचीवर्दळ : महत्वपूर्णपूल असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. चार ही मार्गाने वाहने येत असल्याने पुलावर वाहनांचा भार वाढतो. वाहनांची गर्दी लक्षात घेता पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाय योजना करणे गरजेचे आहे.

अनेकांनारोजगाार : उड्डाणपुलाच्याफूटपाथने शहरातील अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. आज ही अनेकजण दिवसभर फुटपाथवर बसून विविध व्यवसाय करतात. प्रामुख्याने वाहनांवर क्रमांक टाकून देणाऱ्या पेंटरची यामध्ये सर्वाधिक संख्या आहे. शिवाय वाहनांचे कव्हर, कुल्फीवाले यांचा देखील व्यवसाय फुटपाथवरच चालतो.

चकाचक फुटपाथ
राजकमल उड्डाण पुलाची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली. शहरात सौंदर्यीकरण करीत असताना उड्डाणपुलावरील फुटपाथची देखील दुरुस्ती करण्यात आली. चेकर्स लावण्यात आल्याने फुटपाथ चकाचक करण्यात आले आहे.

असा आहे पत्रातील मजकूर
महोदय,
अमरावतीशहरातील राजकमल चौकाला लागून असलेल्या अमरावती बडनेरा रेल्वे पूल ५० वर्षांपेक्षा जुना आहे. हा पूल मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला आहे. त्यामुळे या रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य केंद्रीय मार्ग योजना (सीआरएफ) मधून करण्यासाठी २० कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी प्रदान करण्याची विनंती करीत आहे.

पुढे काय?
सीआरएफमधूननिधीची प्रतीक्षा : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी निधी मिळावा म्हणून पत्र देण्यात आले. केंद्रीय मार्ग योजना (सीआएफ) मधून निधी मिळण्यास उड्डाण पुलाची निर्मिती लवकर करणे शक्य होणार आहे.

राजकमल चौकातीलउड्डाण पुलाची क्षमता तपासणी जाणार आहे. मात्र आता या पुलाची दुरुस्ती केली जाणार नाही. राजकमल ते रेल्वे स्थानक चौकादरम्यान नवीन उड्डाणपूल निर्मितीचा प्रस्ताव तयार केल्या जाणार आहे. पालकमंत्री पोटे यांनी देखील बैठकीत याबाबत सूचना दिल्या आहेत. एस.आर. जाधव, शहर अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.
पुढे पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...