आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा-पालकांमध्ये वादंग, सेंट थॉमस स्कूलमधील प्रलंबित शैक्षणिक शुल्काचा मुद्दा तापला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट थॉमस स्कूलच्या प्राचार्या अर्चना राजगोरडे यांच्यासोबत वाद घालताना पालक. - Divya Marathi
सेंट थॉमस स्कूलच्या प्राचार्या अर्चना राजगोरडे यांच्यासोबत वाद घालताना पालक.
अमरावती- विद्यार्थ्यांच्यावार्षिक शैक्षणिक शुल्कावरून स्थानिक आरटीओ चौकातील सेंट थॉमस इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवार, २१ ऑगस्टला चांगलाच वादंग झाला. मोठ्या प्रमाणात शुल्क प्रलंबित असल्याच्या कारणावरून शाळा संचालक पालक आमने-सामने आल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.दरम्यान, तब्बल ६० टक्के पालकांवर तीन वर्षांचे शैक्षणिक शुल्क प्रलंबित असून, शाळेच्या प्रगतीसाठी ते शुल्क वसूल करण्यावर शाळा व्यवस्थापन ठाम असल्याने हा विषय आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
ख्रिश्चन अल्पसंख्याक दर्जा असलेल्या स्वयंअर्थ साहाय्यित सेंट थॉमस इंग्लिश स्कूलमध्ये ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. या शाळेला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कातून शाळेमध्ये विविध विकासकामे केली जातात, शिवाय शिक्षकांचे वेतनदेखील यामधून केले जात असल्याची माहिती आहे. शाळेची गुणवत्ता ढासळत असल्याची तक्रार पालकांकडून मागील शैक्षणिक सत्रात प्राचार्यांकडे करण्यात आली होती. पालकांच्या मागणीनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार तब्बल १३ नवीन शिक्षकांची नियुक्तीदेखील शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली. शिवाय पालकांच्या उर्वरित.पान
पुढे काय?

संघर्ष पेटणार : विद्यार्थ्यांच्याशैक्षणिक शुल्कावरून पालक सेंट थाॅमस इंग्लिश स्कूल व्यवस्थापनादरम्यान वादंग सुरू झाला अाहे. शुल्कासाठी तगादा लावता येणार नाही, अशी पालकांची भूमिका आहे, तर सुधारणांसाठी शुल्क आवश्यक असल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात यावरून संघर्ष पेटण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

पैसा नाही, पगार कसे देणार?
शैक्षणिकशुल्क प्रलंबित अाहे, शिवाय कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसल्याने शाळेचे खाते रिकामी आहे. विविध सुधारणात्मक कामे शाळा व्यवस्थापनाकडून केली जात आहे. पैसे नसल्याने देयके कसे अदा करणार? शिवाय शिक्षकांचे वेतन कसे देणार?, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. पालकांनी शुल्क अदा करून सहकार्य करावे,असे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

रंगरंगोटीसह दुरुस्तीची कामे
मागीलतीन वर्षांपासून प्रलंिबत असलेले शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या याच शैक्षणिक शुल्कातून शाळेमध्ये रंगरंगोटीसह विविध कामे सुरू करण्यात आली आहे. शाळेवरील छताची दुरुस्ती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, खोल्यांमधील खड्डे बुजवणे, शिकवण्यासाठी आकर्षक फळे आदी विकासकामे करण्यात आल्यामुळे प्रलंबित शुल्क वसुलीवर भर िदला जात आहे.

सुधारणा हवी असेल,तर शुल्क भरणे गरजेचे
^पालकांच्यामागणीनुसार शाळेतील ८० टक्के कर्मचारी वर्ग बदलला.रंगरंगोटीसह विविध बदल केले जात आहे. मात्र, त्यासाठी पैशांची गरज भासते. अद्याप तीन वर्षांतील ६० टक्के, तर या शैक्षणिक सत्रातील ८० टक्के पालकांकडे शुल्क प्रलंबित आहे. सुधारणा हवी असेल, तर शुल्क भरणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे पालकांना नोटीस दिली, तरी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास दिला जात नाही. अर्चनाराजगोरडे, प्राचार्या, सेंट थॉमस इंग्लिश स्कूल ,अमरावती.

पालकांचा राग विद्यार्थ्यांवर काढू नये
^विद्यार्थीमिळत नसताना शाळेने फिरून प्रवेश करवून घेतले. मात्र, आता शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. काही पालकांकडून शुल्क भरण्यास विलंब झाला, ही बाब मान्य असली तरी शुल्क भरल्याने विद्यार्थ्यांना बाहेर बसवले जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रकार चुकीचा आहे. शिवाय शिक्षणाधिकाऱ्यांचेदेखील शाळेवर कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते. धीरजजयस्वाल, शहराध्यक्ष , प्रहार संघटना
शुल्क वसुलीच्या मुद्द्यावरून शाळेच्या परिसरात एकत्रित जमलेले पालक.