आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाॅट्सअॅपवरील अश्लील पोस्टविरुद्ध आदिवासी बांधवांनी काढला मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी- साेशल मिडीयावरील ओम साईराम गृपच्या सदस्याने व्हाॅट्सअॅपवर आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारी अश्लील पोस्ट टाकून समाज बांधवांचा अपमान केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. प्रसंगी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र सदर प्रकार हा जाणिवपूर्वक द्वेषाच्या करण्यात आल्याने संबधितांवर अनुसूचित जाती, जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी मंगळवारला दुपारी उपविभागीय कार्यालय पोलिस ठाण्यावर आदिवासी समाजबांधवांनी मोर्चा काढला.

शहरातील जुगनू पांडे यांने ओम साईराम या गृपवर एका पुरुष महिलेचा नग्न फोटो टाकून पंतप्रधान आदिवासी कल्याण योजना नाव देऊन सदर फोटो प्रसारित केला होता. या गृपचा अॅडमिन लाठी येथील निलेश खोके राहूल बोरपे आहे. याच गृपमध्ये स्वप्नील मेश्राम हा युवक आहे. स्वप्नील हा आदिवासी समाजाचा असल्याने त्याच्या भावना दुखावल्या गेल्या. स्वप्निलने पोलीस ठाणे गाठून यासंबंधीची तक्रार दिली. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली होती. सदर प्रकार हेतुपूरस्सर दोन समुहात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नाने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. परिणामी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोन समुहात जाणूनबुजून तेढ निर्माण करणाऱ्यांवर जाती, जमाती सार्वजनिक शांतता सुव्यवस्थेला धोका पोहचवणे तसेच राष्ट्रीय सहिष्णुता, शांतता , एकात्मता यांना ही धोका पोहचवणे या कारणावरून दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मंगळवारला आदिवासी समाजबांधवांनी उपविभागीय कार्यालय, पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून निवेदन सादर केले. यावेळी स्वप्नील धूर्वे, स्वप्नील मेश्राम, शंकर किनाके, अश्विन डोनेकर, सौरभ येलादे, त्रंबक गेडाम, बाबाराव मडावी, विशाल मडावी, अॅड अरविंद सीडाम, मारोती आत्राम, अनिल मरापे, अविनाश तोडासे, संतोष चांदेकर, सह शेकडो बांधव उपस्थित होते.

सोशल मिडीया हे सध्या सर्वात प्रचलित असे संवादाचे आधुनिक माध्यम बनले आहे. या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नावर सामंजस्याने चर्चा करण्यात येऊ शकते, प्रश्नावर तोडगा काढता येऊ शकतो त्यासोबतच अश्लील पोस्ट टाकल्यास समाजामध्ये तेढही निर्माण होऊ शकते. ओम साईराम गृपमध्ये असेच घडल्याने गृप अॅडमिनविराेधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आज या विरोधात मोर्चाचे आयोजन झाले.