आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Worm Destructive Tablets In Amravati

जंतनाशक गोळ्यांनी विद्यार्थ्यांना मळमळ, मोर्शी येथील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी- राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाटलेल्या गोळ्यांनी शहरातील शिवाजी कन्या शाळेतील ६० ते ७० विद्यार्थिनींची प्रकृती अचानक बिघडल्याने शाळा प्रशासन पालकांमध्ये खळबळ उडाली. प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
महाराष्ट्र शासनाने जंतनाशक दिनानिमित्त बुधवारी शहरातील सर्व शाळांमध्ये सरकारी दवाखान्यामार्फत अलबेन्डॉझोल या जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले. काही शाळांनी विद्यार्थ्यांना या गोळ्यांचे वाटप केले, तर काहींनी केले नाही. शिवाजी कन्या शाळेत दुपारच्या सत्रात शाळेकडून जेवणानंतर विद्यार्थिनींना या जंतनाशक गोळ्या दिल्या. गोळ्यांचे सेवन केल्यानंतर थोड्या वेळातच काही विद्यार्थिनींना पोटात दुखायला लागले, तर काहींना उलट्या व्हायला लागल्या. इतर विद्यार्थिनींनाही लक्षणे दिसताच त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. पालकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात ३०० ते ४०० नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे विद्यार्थिनींवर उपचार करण्यातही अडचणी निर्माण झाल्या.

अलबेन्डॉझोल या जंतांच्या गोळ्यांच्या काही बॅचेसमध्ये बिघाड असल्यामुळे विद्यार्थिनींना असा त्रास होऊ शकतो, असे मत काही डॉक्टर मंडळींनी व्यक्त केले. नगर परिषदेच्या एका शिक्षकानेदेखील ही गोळी घेतल्यानंतर त्यांनादेखील अस्वस्थ वाटायला लागले. ते उपचारासाठी त्वरित उपजिल्हा रुग्णालयात आले. त्यामुळे या गोळ्यांमध्येच काही दोष असावा, यामुळेचे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल बोंदरे सहकाऱ्यांनी उपचार करून साजिया परवीन, अपेक्षा राऊत, वैष्णवी फुले, सारिका पकडे, गायत्री नागोसे, प्रतीक्षा मोहोड या विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील िजल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर डॉ. कुऱ्हाडे किरण कुऱ्हाडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना सहकार्य केले.

उपचारासाठीउपजिल्हा रुग्णालयात दाखल :
सरकारीदवाखान्यातून विद्यार्थिनींना वितरण करण्यासाठी अलबेन्डॉझाेल या जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. दुपारी जेवणानंतर विद्यार्थिनींना या गोळ्या देण्यात आल्यात. ज्या विद्यार्थिनींनी या गोळ्या घेतल्या, त्यांची प्रकृती खराब होऊ लागली, त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात भरती केले, असे शिवाजी कन्या शाळेचे मुख्याध्यापक अनंत गोहाड यांनी सांगितले.
शिक्षकपालकांनी घाबरू नये :
यागोळ्यांमध्ये अलबेन्डॉझोल नावाचा जो घटक असतो, त्यामुळे काहींना पोट दुखणे, मळमळणे, उलटी होणे हा त्रास होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलाही धोका होणार नाही, काळजी करण्याचे कारण नाही, असे मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बोंदरे यांनी सांगितले.

गोळ्यामुळेझाले किंवा नाही, हे तपासावे लागणार : आजजंतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यातील लाख ६५ हजार विद्यार्थ्यांना अलबेन्डॉझोल या गोळ्या देण्याचे आमचे उद्दिष्ट होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मात्र, मोर्शीमध्ये काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवला. त्यांना जो त्रास झाला तो गोळ्यांमुळे झाला किंवा अन्य काही कारण आहे. हे तपासावे लागणार आहे, असे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेदरम्यान मोर्शीत झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले आहे. मोर्शी नगरपालिकेच्या शाळेत जंतनाशक गोळ्या सेवन केल्यावर विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. विद्यार्थ्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणाची दखल पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतली असून, तातडीने वस्तुस्थिती अहवाल सादर करून चौकशीचे आदेश दिले आहे.