आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३२ तासांनंतर श्याम उतरला टॉवरवरून खाली, अतिक्रमणांना लीजपट्टे देण्याबाबत ठराव मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- इसापूर येथील - क्लास जमिनीवरुन हाकलण्यात आलेल्या आदिवासींना पुनश्च तीथे बसू द्यावे या मागणीसाठी तहसीलच्या टॉवरवर चढलेला श्याम गायकवाड प्रशासनाच्या आश्वासनानंतरच १३२ तासांनंतर खाली उतरला आहे.

तालुक्यातील इसापूर येथील सर्व्हे क्र. २१ च्या शासनाच्या इ-क्लासच्या जमिनीवर रुई तलाव येथील आदिवासी बांधवांनी १२ घरांची निर्मिती केली असता इसापूर येथील साळुंके परिवाराने हल्ला करून १२ आदिवासींचा संसार उद्ध्वस्त केला. त्या आदिवासींच्या १२ झोपड्या पुनश्च स्थापन होईपर्यंत श्याम गायकवाड या युवकाने येथील तहसीलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते. मरणानंतर अंतिम क्रियाक्रम करण्यास लागणाऱ्या सर्व वस्तू श्यामने सोबत टॉवरवर नेल्या होत्या. आपले जर बरेवाईट झाले, तर सर्व्हे नं.२१ मध्येच आपणास दहन करावे, असे श्याम टॉवरवरून सांगत होता. ४२ अंश डिग्रीच्या तळपत्या सूर्याखाली कडक उन्हात श्यामचे आंदोलन सुरू होते. अनेक अधिकारी नागरिक श्यामला खाली उतरण्याचे आवाहन करत होते. परंतु, जोपर्यंत १२ आदिवासी यांच्या झोपड्या पुनश्च स. नं. २१ मध्ये बसणार नाही तोपर्यंत आपण खाली उतरणारच नाही, असा पवित्रा श्यामने घेतला होता. त्यामुळे ग्रा. पं. इसापूर यांनी २५ एप्रिल रोजी दुपारी वाजता ग्रा. पं. कार्यालय येथे आमसभा घेऊन उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मौजा इसापूर येथील गट क्र.२१ इ-क्लास जमिनीवर इसापूर, दत्तापूर, रुई-तलाव, पेळू इतर लोकांना राहण्यासाठी जागा आवश्यक आहे. त्याकरिता लीजपट्टेसाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मान्यतेसाठी पाठवण्यात येत आहे, असा ठराव मंजूर केला. ठराव सभा सरपंच निर्मला जनार्धन धनसावत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तो ठराव तहसीलदार दिग्रस यांना देण्यात आला, तर लीजपट्टे मिळण्याकरिता सर्व आदिवासी बांधवांचे प्रस्ताव प्राप्त होताच ते मंजुरीकरिता जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्याच्या जबाबदारीचे लेखी आश्वासन इसापूर ग्रा.पं.च्या ठराव तहसीलदार नितीनकुमार देवरे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, नायब तहसीलदार प्रकाश खाटिक, तलाठी प्रणिश दुधे, सचिव रेणुका बावणे यांनी इसापूर येथील सरपंच ग्रा.पं. सदस्य यांच्या समक्ष श्याम गायकवाड याला दिला तेव्हा १९ एप्रिलचे रात्री १:३० वाजता सुरू केलेले टॉवर आंदोलन २५ एप्रिलला सहाव्या दिवशी दुपारी १:३० वाजता तब्बल १३२ तासांनंतर श्याम हा टॉवरवरून खाली उतरला.

पुन्हा दिला इशारा
लीजपट्टे मिळवून देण्यात जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही हयगय झाल्यास पुढील आंदोलन याहीपेक्षा तीव्र राहील, असा इशारा श्याम गायकवाड याने यावेळी प्रशासनाला दिल्याने आंदोलनाची टांगती तलवार कायम राहिली आहे.