आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issued Notice To Technical Secratary, Education Directore

तंत्रशिक्षण सचिव, शिक्षण संचालकांना नाेटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या नियमानुसार बीएड व एमएड महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची पुरेशी संख्या नसताना प्रवेश देण्यात येतात. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावे,’ अशी मागणी करणारी जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल झाली.

डॉ. साधना माकरे आणि इतर चौघांनी दाखल केलेल्या याचिकेवरील प्रारंभिक सुनावणीनंतर खंडपीठाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण सचिव आणि उच्च शिक्षण संचालकांना नोटीस बजावली आहे. याचिकेनुसार, नागपूर विद्यापीठांतर्गत बीएड अभ्यासक्रम चालवणारे ११९ महाविद्यालये आहेत, तर एमएडची ५६ महाविद्यालये अाहेत.
बीएड महाविद्यालयांसाठी एक प्राचार्य, एक प्रपाठक आणि सहा अधिव्याख्याते असण्याची आवश्यकता आहे, तर एमएड अभ्यासक्रमासाठी प्राचार्य, एक प्रपाठक आणि तीन अधिव्याख्या असण्याची गरज आहे. परंतु, या नियमांचे कुठेही पालन होत नाही आणि राज्य सरकार व महाविद्यालये सर्रास शंभर टक्के जागांवर प्रवेश देतात, याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले अाहे.