आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण व्यवस्था बंद पाडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती जिल्ह्यातील गोदामात काम करणाऱ्या नोंदित माथाडी कामगारांना शासन निर्णयाप्रमाणे महागाई भत्त्याची वाढ देणे आणि थकबाकीची रक्कम देण्यासाठी ६७ लाख ४९ हजार ६५१ रुपये अनुदान उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंरक्षित माथाडी कामगार मंडळाने गुरुवारी (दि. १५) सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन सादर केले. मागण्या पूर्ण झाल्यास अन्नधान्य वितरण व्यवस्था बंद पाडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

शासकीय धान्य गोदामात माथाडी मंडळाचे नाेंदित कामगार काम करत असून, कामगारांना किमान वेतन आणि प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. किमान वेतन लक्षात घेऊन कामाचे आधारभूत दर ठरवले जावे, असेही या निर्णया नमूद असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी केली जावी, यासाठी मंडळ आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याशी अनेक वेळा पत्रव्यवहार झाला. पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्त्याची वाढ देण्याचे अन्यधान्य वितरण अधिकारी यांनी मान्य केले असतानाही कामगारांना किमान वेतन मिळाले नाही. शासनाचे अन्नधान्य वितरणाचे काम बंद पडू नये, यासाठी शासनाने तत्काळ कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी मंडळाने केली आहे. या वेळी मंडळाचे सचिव निवृत्ती धुमाळ यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
या आहेत मागण्या

-शासनाच्याउद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या २९ एप्रिल २००८ शासन निर्णयाची अंमलबाजवणी त्वरित केली जावी.
-कामगारांचेकिमान वेतन ठरवून त्यानुसार आधारभूत दर ठरवण्यात यावे.
-२००८पासून प्रत्येक मार्च महिन्यात महागाई निर्देशांकानुसार येणारी वाढ आधारभूत दरात समाविष्ट करून पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी.
-मजुरीच्यादरावर माथाडी मंडळाची लेव्ही सी शासनाने अदा करावी.
-थकितसहा महिन्यांच्या वेतनाचा निर्णय त्वरित घेऊन वेतनाचे वाटप कामगारांना करण्यात यावे. तत्पूर्वी कामगारांची उपासमार होऊ नये, यासाठी १० हजार उचल रक्कम कामगारांना दिली जावी.