आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानसोबतच तेलंगणही राबवणार ‘जलयुक्त’ मॉडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार याेजनेचे माॅडेल राजस्थान आणि तेलगंण राज्यांनीही स्वीकारले अाहे. योजनेच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राच्या अिधकाऱ्यांनी या दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी २६ जानेवारीपासून ही योजना राजस्थानात सुरू करणार असल्याचे अलीकडेच जाहीर केले.

‘महाराष्ट्रातील पाहणीनंतर राजस्थान सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना बोलावून योजनेची माहिती घेतली. प्रशिक्षण घेऊन त्यांनी योजनेचा अधिनियम काढला. प्रायोगिक तत्त्वावर तिथे योजना सुरूही झाली असल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘जलयुक्त'च्या माध्यमातून ९ महिन्यांत ६ हजार गावांत २४ टीएमसी पाणी साठवले गेले. पुढील वर्षी आणखी पाच हजार गावांत योजना राबवली जाईल. यशात लोकसहभागही मोलाचा राहिला. १४०० कोटींच्या या प्रकल्पात लोकसहभागातून २५० कोटींची कामे झाली. शाश्वत शेतीच्या विकासाचा हा महत्त्वपूर्ण असा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

िनम्मे लोक ११ टक्के वाट्यावर जगतात
पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात कृषी संकट आहे. राज्यात गतवर्षी २४ हजार गावांत दुष्काळ होता. यंदा १५ हजारांवर गावांत दुष्काळस्थिती आहे. ५० टक्के लोक शेतीवर विसंबून आहेत. राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा ११ टक्के आहे. हे ५० टक्के लोक केवळ ११ टक्के वाट्यावर जगतात. त्यामुळे शेतीवरचा रोजगाराचा भार कमी करणार नाही तोवर उत्पादकता वाढणार नाही. त्यामुळे नवनवीन प्रयोग करावे लागतील.’
धोका कमी, फायदा जास्त
धरण जेवढे मोठे तेवढा धोका जास्त आणि पर्यावरणाचा ऱ्हासही जास्त. जलयुक्त शिवार योजनेत मात्र नाले आणि नदीचेच पात्र खाेल केले जात असल्यामुळे वेगळी जमीन लागण्याचा प्रश्न येत नाही आणि धोकाही राहत नाही. शिवाय वेगळे पाट बांधणे, त्यासाठी खर्च करणे आणि भूसंपादनाचीही गरज उरलेली नाही. पाणी थेट शेतात आणि शेतांतील विहिरींमध्ये पोहोचले आहे.
धरण भंडारदरा निळवंडे जलयुक्त शिवार
क्षमता ११.३९ टीएमसी ०७.७५ टीएमसी २४ टीएमसी साठले
भूसंपादन ९ गावांमध्ये १२० हेक्टर वेगळे भूसंपादन नाही
काम १६ वर्षे १२ वर्षे १० महिने काम