आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सप्टेंबरपासून जलयुक्त शिवारचे ‘जिआे टॅगिंग’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली जलयुक्त शिवार योजना मुदतीत पूर्ण व्हावी आणि त्यात कोणताही खोटेपणा होऊ नये म्हणून येत्या सप्टेंबरपासून राज्यात जलयुक्तच्या कामाचे जिओ टॅगिंग करण्यात येईल. त्यामुळे यात कोणीही बनावट छायाचित्रे अपलोड करू शकणार नाही. कारण त्यात अक्षांश व रेखांश अशी बारीक-सारीक माहिती असेल, अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी येथे दिली. नागपूर विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

नाशिकसह काही ठिकाणी इतर ठिकाणच्या कामांची छायाचित्रे टाकून इतकी चांगली कामे आपल्या िवभागात झाल्याचे दाखवण्यात आल्याचे प्रकार घडले. या संदर्भात विचारले असता शिंदे यांनी यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून जिओ टॅगिंग करणार असल्याचे स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ मधील गावांमध्ये २०३०७० कामे पूर्ण करण्यात आली, तर १८,१६२ कामे प्रगतिपथावर आहेत. २०१६-१७ मध्ये २९,४८७ कामे पूर्ण करण्यात आली असून ११,१५५ कामे प्रगतिपथावर आहेत. हे लक्षात घेता २०१५-१६ मधील गावांमध्ये आतापर्यंत ११,६१,६२६ दलघमी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याद्वारे ६ लाख हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार असून दोन संरक्षित सिंचन मिळू शकते, असे शिंदे म्हणाले. लोकसहभागातून राज्यात आतापर्यंत ४८० कोटींची कामे करण्यात आली आहेत. जून २०१६ पर्यंत होऊ न शकलेल्या जलयुक्तच्या कामांना डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

जलयुक्तच्या कामासाठी १६०० कोटींचा िवशेष निधी देण्यात आला. त्यापैकी २९३ कोटी ४३ लाखांचा निधी अखर्चित राहिला. संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार योजनेत दिलेला निधी अखर्चित राहिला आहे. िवदर्भात अनुशेषामुळे मागणी होते, मात्र निधी खर्चाविना राहतो. यापुढे निधी अखर्चित राहता कामा नये, अशी तंबी राम शिंदे यांनी दिली.

जून २०१६ पर्यंत अखर्चित राहिलेला निधी याप्रमाणे
विभाग अखर्चित निधी
नागपूर ४२.९९
अमरावती ४३.५४
नाशिक २५.३८
पुणे ३२.८७
कोकण ३.०६
औरंगाबाद १४५.५९
एकूण २९३.४३
(आकडे कोटीत)
बातम्या आणखी आहेत...