आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली: पहिल्याच दिवशी स्वत:वर गोळी झाडून जावानाचा आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्य राखीव पोलिस दलाच्या सोलापूर येथील ग्रुपमधून गडचिरोलीत पाच महिन्यांच्या कालावधीसाठी दाखल झालेल्या जवानाने कामाच्या पहिल्याच दिवशी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी त्यामागे कौटुंबिक कारण असण्याची शक्यता असल्याचे गडचिरोली पोलिसांनी व्यक्त केली. किरण कांबळे असे जवानाचे नाव आहे. 

ही घटना गुरुवारी रात्री घडली असताना गडचिरोली पोलिसांनी त्याबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. सोलापूर येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले किरण कांबळे यांचे पाच महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यात पोस्टिंग झाले होते. गुरुवारी ते अहेरी येथील प्राणहिता उपमुख्यालयात रुजू झाल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्यांना सुरुवातीला अहेरी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर नंतर नागपुरात हलवण्यात आले. दरम्यान, १७ जुलै रोजी भामरागड तालुक्यात ताडगाव येथे बी. हनुमंत या ४५ वर्षीय जवानाने बंदुकीतून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 
बातम्या आणखी आहेत...