आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकरांच्या हत्येतील आरोपींची छायाचित्रे राज्यभर लावून ‘जबाब दो’ करणार: हमीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- डाॅ. नरेंद्र दाभाेलकर व काॅ. गाेविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढाकार घेणार आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींची छायाचित्रे राज्यभर लावून ‘जबाब दो’ आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी वर्धा येथे बोलताना दिली. 
   
सरकारची भूमिका उदासीन असल्याचा आरोप करताना हमीद दाभोलकर म्हणाले की, ‘अाराेपींचा शोध सुरू असल्याचे ठरावीक वाक्य सरकारकडून सांगितले जाते. मात्र, अद्याप सरकारला मारेकऱ्यांचा शोध लावण्यात यश आलेले नाही. सीबीआयने मारेकऱ्यांच्या शोधासाठी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले असताना अद्याप महाराष्ट्र सरकारला ते करता आलेले नाही. सरकार आपली जबाबदारी नीट पार पाडत नसल्याने आता स्वतः अंनिस त्यासाठी पुढाकार घेणार आहे. २० जुलै ते २० ऑगस्टदरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरांमध्ये मारेकऱ्यांची छायाचित्र लावली जातील. त्यातून मारेकऱ्यांची माहिती मिळू शकेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   

राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय बिकट आहे. कर्ज व इतर कारणांमुळे तणावग्रस्त बनलेल्या शेतकऱ्यांना अंनिस मदतीचा हात देण्याचे अंनिसने ठरविले आहे. अंधश्रद्धा समितीचे कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकरी कुटुंबांशी चर्चा करतील. तणावग्रस्त शेतकऱ्यांची माहिती गोळा करून त्याच्या मानसिक ताणावर उपचार केला जाईल. त्यासाठी समितीच्या वतीने कायकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.