आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JNU: Crowd Increase To See Wanted Umar Khalid In Talegaon

जेएनयू वाद : ‘वाँटेड’ उमर खलीदचे घर पाहण्यास तळेगावात गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमर खलीदचे घर पाहण्यासाठी लोक दशासरमध्ये बरीच गर्दी करत आहेत. - Divya Marathi
उमर खलीदचे घर पाहण्यासाठी लोक दशासरमध्ये बरीच गर्दी करत आहेत.
तळेगाव (अमरावती) - नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेला उमर खलीदच्या मूळ गावातील घर पाहण्यासाठी सध्या लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. तो मूळचा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. उमर खलीदचे वडील सय्यद कासीम इलियास रसूल हे तळेगाव दशासरचे रहिवासी होते. येथील वॉर्ड क्रमांक ६ सवारपुरा भागात कासीम यांचे घर आजही आहे, असे तळेगावचे सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

खलीदचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीसांचे एक पथक अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, तूर्तास तरी असे कोणतेही चौकशी पथक तळेगाव दशासर येथे येऊन गेल्याची माहिती नाही, असे अमरावतीचे पोलिस अधीक्षक लख्मी गौतम यांनी सांगितले आहे.

पुढे वाचा... २५ वर्षांपासून गावाशी नाही संबंध