आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड वाहनास साईड देताना ट्रॅव्हल्स रस्त्यावरून कलंडली, नागरिकांनी दिला लाकडाचा आधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस येथे अपघातानंतर ट्राव्हल्स रस्त्याच्या बाजूला अशी कलंडली. - Divya Marathi
दिग्रस येथे अपघातानंतर ट्राव्हल्स रस्त्याच्या बाजूला अशी कलंडली.
दिग्रस : येथील शंकर टॉकीज परिसरातील दिग्रस- पुसद मार्गे नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहेत. त्यासाठी संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला तात्पुरता रस्ता तयार केला होता. परंतु पहिल्याच पावसामध्ये तयार केलेला तात्पुरता रस्ता हा वाहून गेल्याने पायदळ दुचाकी धारकांना पुसद-दिग्रस बायपास मार्गे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा असलेला मार्गे पत्करावा लागत आहे. 
 
दिग्रस-पुसद मार्गे बायपास मार्गावरून जड वाहने जाणे आवश्यक आहे. परंतु काही जड वाहने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या एकेरी मार्गाने जात असल्याने जड वाहनांना साइड देताना रस्ता अपुरा पडून अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेव्हा जिल्हा परिषद बांधकाम विभाग आर्णी यांनी एकेरी असलेल्या रस्ता जड वाहनांसाठी बंद करावा. 
 
जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या एकेरी रस्त्याचा अवलंब जड वाहने करीत असल्याने या रस्त्याने वाहतूक करणाऱ्यांना या जड वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग बंद करून जड वाहनांसाठी पुसद दिग्रस बायपास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचा वापर करण्यासाठी या एकेरी रस्त्यावर दोन्ही बाजूला आवरण तयार करणे गरजेचे आहे. अन्यथा या मार्गावर मोठा अपघात होऊन बळी पडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे. 
 
सध्या शाळा सुरु होणार असून या एकेरी रस्त्यावरून देवनगर, काटी, इसापुर, रुई,सिंगद, नांदगव्हाण,वसंतपुर खर्डा, राहटी, पेळू, सुदर्शन नगर आदी भागातील विद्यार्थी दिग्रस येथील शाळेत येण्यासाठी या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रस्त्याचा वापर करीत असतात.
 
या एकेरी रस्त्याने विद्यार्थी सायकलने दिग्रसकडे प्रवास करतात.जड वाहने सुद्धा या मार्गाने येत असल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नसून हा रस्ता जड वाहनांसाठी बंद केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.जड वाहनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मार्ग अवलंबल्यास अपघातावर अंकुश मिळू शकतो. 
 
१७ जून रोजी सकाळी १० वाजता ‘विदर्भ’ ट्रॅव्हल्सची ही पुणे ते यवतमाळ असलेली पुसद मार्गे दिग्रस बायपास जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या एकेरी रस्त्यावरून दिग्रसकडे येताना समोरून येणाऱ्या जडवाहनास साइड देताना ट्रॅव्हल्स रस्त्याचा बाजूला पलटी होणार असताना त्या रस्त्यावरील चिंतामणी गॅस गोडाऊन येथे असलेले गॅस गोडाऊन किपर साहेबराव दातीर,अफसर शहा नन्ना शहा,फिरोज शहा सत्तार, गुणवंत राऊत,गोपाल राऊत, गजानन बिबेकर,अजय स्वर्ग,अनिल अवचार, शंकर गायकवाड,दशरथ कांबळे, महेंद्र कांबळे यांनी ‘विदर्भ’ ट्रॅव्हल्स कडे धाव घेत ट्रॅव्हल्सच्या एका बाजूला काही जणांनी ओढून धरले तर काहींनी ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांना बाहेर काढले.
 
 ट्रॅव्हल्स पलटी होण्याची शक्यता असलेल्या त्या भागात मोठे लाकडे लावून ट्रॅव्हल्सला लाकडाच्या रापटरचा टेका देऊन ट्रॅव्हल्सला उभा अवस्थेत ठेवले. जर कोणीही मदतीला धावले नसते तर ही ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात घडला असता.या होणाऱ्या अपघातावर मदतीला धावणाऱ्यांमुळे ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने सुदैवाने जीवित्वाचा धोका टळला. 
 
या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या एकेरी मार्गावरील जडवाहनांची वाहतूक बंद करणे गरजेचे असून बंद केल्यास एखाद्या दिवशी मोठा अपघात होण्याची चिन्हे दिसत आहेत.या मार्गावरून जडवाहनास बंदी जिल्हा परिषद बांधकाम विभाग आर्णी यांनी करावी अन्यथा या मार्गावर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत जनसामान्यांच्या तोडून ऐकवयास मिळत होते.
 
या मार्गावरून ऑटो,दुचाकी,सायकल पायदळ यांनीच प्रवास करावा असे बंधनकारक करणे जरुरी आहे.परंतु या मार्गाचा वापर दिग्रसमध्ये जाण्यासाठी अंतर कमी असल्याचे पाहून जडवाहने या मार्गावरून भरधाव वेगात नेतात तेव्हा या मार्गावरील जड वाहतूक बंद करावी. याच मार्गाला जोडून असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा बायपास मुख्य मार्गाचा अवलंब जडवाहनांनी करावा अन्यथा या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या एकेरी मार्गाचा वापर जडवाहनांनी केल्यास अपघात झाल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र स्पष्ट आहे. 
 
दिग्रस शंकर टॉकीज मार्गे पुसद मार्गावरील पुलाचे बांधकाम अंदाजे एक ते दीड महिन्यांपासून सुरु असल्याने जडवाहनांना या मार्गावर बंदी असल्याने जडवाहनांनी बायपास मुख्य मार्गावरून वाहतूक करावी असे आदेश आहेत.परंतु मुख्य रस्त्याला जोडून असलेला जिल्हा परिषदेचा एकेरी रस्ता असल्याने जडवाहन धारक या एकेरी रस्त्याचा वापर करीत आहेत.तेव्हा संबंधित विभागाने हा एकेरी रस्ता जडवाहनांसाठी बंद करावा तेव्हाच मुख्य बायपास रस्त्याचा वापर जडवाहन करतील असे काहीही झाल्यास अनुचित प्रकार घडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा जिल्हा परिषद बांधकाम विभाग आर्णी यांनी या एकेरी रस्त्यावर जड वाहनांसाठी बंदी घालण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही भागावर बंधन करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...