आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी भेट घेतल्यानंतर चर्चेत आली होती ही महिला, अपघातात झाला मुलाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलावती बांदूरकर ही महिला राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर चर्चेत आली होती. - Divya Marathi
कलावती बांदूरकर ही महिला राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर चर्चेत आली होती.
यवतमाळ- राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर चर्चेत आलेली आत्महत्याग्रस्त शेतकरी परशुराम बांदूरकर यांची पत्नी कलावती हिच्या एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. कलावतीचा मुलगा चंद्रपूर येथून आपल्या मित्रासमवेत दुचाकीवरुन गावाकडे येत असताना ही घटना घडली. कलावतीला दोन मुले आहेत त्यातील एका मुलाचा मृत्यू झाला आहे. 

पहिल्यादा नवऱ्याने आणि नंतर जावयाने केली होती आत्महत्या
- काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मारेगाव तालुक्यातील जलका गावात राहणाऱ्या कलावतीच्या घरचा दौरा केला होता. त्यावेळी ती चर्चेत आली होती. कलावतीचे पती परशुराम यांनी 2005 मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या जावयाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.
-  कलावती आता आपल्या दोन मुलांसह राहते. परंतु तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तिचा मुलगा बलराम (19) याचा मंगळवारी अपघातात मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...