आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरमध्ये कन्हैया कुमारवर भिरकावली चप्पल; बजरंग दलाने केला हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- दिल्लीतील जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारच्या सभेला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर कन्हैया भाषण देत असताना त्याच्या अंगावर धावून गेले. त्याच्यावर चप्पल भिरकावली. पोलिसांनी चप्पल भिरकवणार्‍या ताब्यात घेतले आहे.

काय म्हणाला कन्हैया कुमार...
'तुम्ही दगड मारणार असाल तरी आम्ही घाबरणार नाही. गुजरात हे मोदींचे नाही तर महात्मा गांधींचे आहे. त्याप्रमाणे नागूपर आरएसएसचे नसून बाबासाहेब आंबेडकरांचे आहे.'

नागपूरमध्ये हाफ पँटवाले नाही तर पूर्ण डोके असलेले लोक राहातात. आश्वासनांवर देश चालत नाही. त्यामुळे नेत्याकडे पाण्याची आपल्याकडे दृष्टी असण्याची गरज असल्याचे कन्हैया म्हणाला. 14 एप्रिलला जाणूनबुजून नागपुरात आल्याचेही त्याने सांगितले. चप्पल फेकून कोणता विकास करायचा आहे? असा सवाल कन्हैयाने उपस्थित केला आहे.

कन्हैयाच्या थोबाडात लगावली होती
दरम्यान, कन्हैय्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या महिन्यातही जेएनयूमध्ये एका तरुणानं . त्याला शिव्याही दिल्या होत्या. तसेच यापूर्वी हैदराबादेतही कन्हैय्यावर बूट फेकण्यात आला होता.
दीक्षाभूमीचे दर्शन घेतल्यानंतर कन्हैया कुमारच्या जाहीर सभेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. 'भारत माता की जय' घोषणा दिल्या. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सभेतून बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कन्हैय्या कुमारच्या भाषणाच्या सुरुवातीला 'जय भीम'च्या घोषणा देण्यात आल्या. नागपुरकरांकडे दीक्षाभूमी असून ते खूप नशिबवान असल्याचे कन्हैय्या कुमारने यावेळी सांगितले. भारत हा लोकशाही देश असून हा देश मनुस्मृतीनुसार चालणार नाही. संघाने नागपूरला बदनाम केल्याचा आरोपही कन्हैया कुमारने केला आहे.
नागपूर ही आरएसएस नव्हे नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) महाराष्ट्राची उपराजधानी बदनाम केली आहे. नागपूर ही भूमी आरएसएसची नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमी असल्याचे वक्तव्य कन्हैया कुमारने केले आहे. दरम्यान, कन्हैयाच्या नागपूर दौऱ्याला बजरंग दलानेविरोध दर्शवत त्याच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीक्षाभूमीवर जाताना लाल सलामचे नारेही लावण्यात आले.
पुढील स्लाइडवर वाचा....
कन्हैयाची चप्पल चोरली... बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली कन्हैयाच्या कारवर दगडफेक... कन्हैयाला द‍िली X दर्जाची सुरक्षा....बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा... कन्हैयाकुमारवर आहे देशद्रोहाचा आरोप...
बातम्या आणखी आहेत...