आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कास पठार खुले, पहिल्या दिवशी फक्त ४० पर्यटक,ऑनलाइन नोंदणी करून येण्याचे विभागाचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कास पठार खुले, पहिल्या दिवशी फक्त ४० पर्यटक ऑनलाइन नोंदणी करूनच येण्याचे वन विभागाचे आवाहन प्रतिनिधी | सातारा जागतिक वारसा असलेले कासचे पुष्प पठार शुक्रवारपासून खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी फक्त चाळीस पर्यटकांनी हजेरी लावल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीच्या दिवशी पर्यटकांना गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. तेव्हा बुकिंग करूनच कासला भेट द्या, असे आवाहन उपवनसंरक्षक अनिल अंजलकर यांनी केले.    फुलांचा हंगाम पाहता यावा म्हणून शुक्रवारपासून हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.  वन विभागाने स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच पार्कंगची व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख पर्यटकांनी पठाराला भेट दिली होती. गर्दी टाळण्यास व वाहनांच्या कोंडीवर उपाय योजना म्हणून सुटीच्या दिवशी केवळ अडीच हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. केएएस.आयएनडी.ईन या संकेतस्थळावर पर्यटकांना आगाऊ नोंदणी करता येईल.     पठरावर वाहनांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. बससाठी १५० रुपये, तर मिनीबससाठी १०० रुपये, चारचाकी वाहनांसाठी ४० रुपये आकारले जातील. छायाचित्र काढण्यासाठीही शुल्क आकारण्यात आले आहे. १५ जणांच्या गटाला एका मार्गदर्शकाची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.    सातारा जिल्ह्यातील कास पठारावर अनेक पर्यटकांनी फुलांसाेबत फाेटाेसेशन केले.  यात पर्यटक, व्यावसायिक छायाचित्रकारांचा सहभाग होता. - Divya Marathi
कास पठार खुले, पहिल्या दिवशी फक्त ४० पर्यटक ऑनलाइन नोंदणी करूनच येण्याचे वन विभागाचे आवाहन प्रतिनिधी | सातारा जागतिक वारसा असलेले कासचे पुष्प पठार शुक्रवारपासून खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी फक्त चाळीस पर्यटकांनी हजेरी लावल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीच्या दिवशी पर्यटकांना गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. तेव्हा बुकिंग करूनच कासला भेट द्या, असे आवाहन उपवनसंरक्षक अनिल अंजलकर यांनी केले. फुलांचा हंगाम पाहता यावा म्हणून शुक्रवारपासून हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. वन विभागाने स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच पार्कंगची व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख पर्यटकांनी पठाराला भेट दिली होती. गर्दी टाळण्यास व वाहनांच्या कोंडीवर उपाय योजना म्हणून सुटीच्या दिवशी केवळ अडीच हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. केएएस.आयएनडी.ईन या संकेतस्थळावर पर्यटकांना आगाऊ नोंदणी करता येईल. पठरावर वाहनांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. बससाठी १५० रुपये, तर मिनीबससाठी १०० रुपये, चारचाकी वाहनांसाठी ४० रुपये आकारले जातील. छायाचित्र काढण्यासाठीही शुल्क आकारण्यात आले आहे. १५ जणांच्या गटाला एका मार्गदर्शकाची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठारावर अनेक पर्यटकांनी फुलांसाेबत फाेटाेसेशन केले. यात पर्यटक, व्यावसायिक छायाचित्रकारांचा सहभाग होता.
सातारा- जागतिक वारसा असलेले कासचे पुष्प पठार शुक्रवारपासून खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी फक्त चाळीस पर्यटकांनी हजेरी लावल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीच्या दिवशी पर्यटकांना गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. तेव्हा बुकिंग करूनच कासला भेट द्या, असे आवाहन उपवनसंरक्षक अनिल अंजलकर यांनी केले.
फुलांचा हंगाम पाहता यावा म्हणून शुक्रवारपासून हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. वन विभागाने स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच पार्कंगची व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख पर्यटकांनी पठाराला भेट दिली होती. गर्दी टाळण्यास व वाहनांच्या कोंडीवर उपाय योजना म्हणून सुटीच्या दिवशी केवळ अडीच हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. केएएस.आयएनडी.ईन या संकेतस्थळावर पर्यटकांना आगाऊ नोंदणी करता येईल.
पठरावर वाहनांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. बससाठी १५० रुपये, तर मिनीबससाठी १०० रुपये, चारचाकी वाहनांसाठी ४० रुपये आकारले जातील. छायाचित्र काढण्यासाठीही शुल्क आकारण्यात आले आहे. १५ जणांच्या गटाला एका मार्गदर्शकाची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील कास पठारावर अनेक पर्यटकांनी फुलांसोबत फोटोसेशन केले. यात पर्यटक, व्यावसायिक छायाचित्रकारांचा सहभाग होता.
बातम्या आणखी आहेत...