आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसरकर म्हणतात, महिला अत्याचाराच्या घटनेत घट, राणे यांचा दावा मात्र वाढीचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर, हा सिंधुदुर्गातील वाद विधान परिषदेत बुधवारी प्रकर्षाने दिसून आला. नगरमधील कोपर्डी बलात्काराच्या घटनेनंतरही राज्यात महिला तसेच मुलींवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असून सरकार उपाययाेजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.
यावर महिला अत्याचारांच्या घटनेत घट झाल्याचे सांगत केसरकरांनी राणेंचा मुद्दा खोडून काढला. यावर केसरकर हे चुकीची माहिती देत असून हे खरे ठरल्यास गृह राज्यमंत्र्यांवर हक्कभंग आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत राणेंनी पलटवार करण्याची संधी साधली.

कोपर्डीनंतर नगर तालुक्यातील वाकोडी गावात दुपारी शेळी चारण्यासाठी गेलेल्या मुलीवर लखन कांबळे व त्याच्या साथीदाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.
यावर केसरकर म्हणाले, आॅक्टोबर २०१५ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत बलात्कारांच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र राणे म्हणाले, राज्यातील गुन्ह्यांमध्ये २०१५ मध्ये १०.२३ टक्क्यांनी वाढ झाली असून ही शरमेची बाब आहे.
बातम्या आणखी आहेत...