Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Khairlanji Hatyakand Victim Bhaiyalal Bhotmange Pass Away, News About Incident Of Khairlanji Massacre

भैयालाल भोतमांगेंचे निधन, असे घडले होते देशाला हादरवणारे खैरलांजी हत्याकांड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 21, 2017, 11:01 AM IST

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर गाजलेल्या खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले.

 • Khairlanji Hatyakand Victim Bhaiyalal Bhotmange Pass Away, News About Incident Of Khairlanji Massacre
  नागपूर- महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर गाजलेल्या खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. भोतमांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने भंडारा येथून तातडीने नागपूर येथे आणण्यात आले होते. डॉ.महेश फुलवाणी यांनी त्यांना तपासले. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

  29 सप्टेंबर 2006 रोजी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात भोतमांगे यांच्या कुटुंबातील चौघांची अमानुष हत्या झाली होती. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर 2008 रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.

  खैरलांजी गावात घडलेल्या हत्याकांड प्रकरणाला गेल्या सप्टेंबरमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या या प्रकरणात एका दलित कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती (सुरेखा भोतमांगे, प्रियंका भोतमांगे, रोशन भोतमांगे आणि सुधीर भोतमांगे) सुरेखा यांचे पती म्हणजेत प्रियंका आणि रोशन, सुधीर यांचे वडील भैय्याला भोतमांगे हे एकटे या हत्याकांडातू बचावले होते. हत्येपूर्वी दोन पीडितांवर सामुहिक बलात्कार झाल्याचेही समोर आले होते.

  या हत्याकांड प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने सहा आरोपींना फाशी आणि दोघांना जन्मठेप सुनावली होती. मात्र हायकोर्टात या निर्णयात बदल झाला. हायकोर्टाने फाशी रद्द करत सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. सध्या या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, काय होती नेमकी खैरलांजीतील घटना...

  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Trending