आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत चौदावर्षीय मुलाची अखेर सुटका; खंडणी मागणारे पाच अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपुरात खळबळ माजवणाऱ्या चैतन्य सुभाष आष्टनकर या १४ वर्षे वयाच्या मुलाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यात नागपूर पोलिसांना शुक्रवारी मध्यरात्री अखेर यश आले. ५० लाखांची खंडणी वसूल करण्यासाठी आष्टनकर कुटुंबीयांच्या एका परिचितानेच चैतन्यचे अपहरण घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले असून शनिवारी सायंकाळपर्यंत यासंदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली.

प्रदीप ओमदास निनावे, इसाक इसरायल शेख, दुर्वास भगवान कोहाड, तयुब समशेर शेख यांच्यासह आणखी एका सहकाऱ्यास अटक करण्यात आली.

येथील मनीषनगर परिसरात पाच जणांनी गुरुवारी चैतन्यचे अपहरण केले होते. या प्रकरणामुळे शहर पोलिस यंत्रणा हादरून गेली होती. नागपुरात मागील दोन-तीन वर्षात घडलेल्या दोन घटनांमध्ये अपहरणकर्त्यांनी मुलांचे जीव घेतल्याने चैतन्य जिवंत सापडणार नाही, अशी भीती साऱ्यांनाच वाटत होती. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी हालचाली करून चैतन्यची सुटका केली.